आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solid Waste Collection Not Properly Issue At Nagar, Divya Marathi

घनकचरा संकलनाची ‘ऐशी तैशी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- घनकचरा संकलनाचे नियोजन कोलमडल्याने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा संकलनासाठीची यंत्रणा कुचकामी ठरली असून संबंधित अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कचरा उचलणार्‍या वाहनांची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली असून अनेक वाहने बंद पडली आहेत. त्यामुळे शहराच्या विविध भागांत कचर्‍याचे ढीग साचले आहेत, तर काही ठिकाणच्या कचराकुंड्या अक्षरश: ओसंडून वाहत आहेत.

शहराचा विस्तार मोठय़ा प्रमाणात वाढला असला, तरी घनकचरा संकलनाची यंत्रणा मात्र जुनीच आहे. सुमारे साडेचार लाख लोकसंख्या व 34 प्रभाग असलेल्या शहरात कचरा उचलण्यासाठी अवघ्या 30 घंटागाड्या आहेत. त्यापैकी 3 घंटागाड्या अनेक वर्षांपासून बंद आहेत, तर उर्वरित घंटागाड्या मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे कचरा संकलन होणार, तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांच्या कार्यकाळात खरेदी करण्यात आलेल्या या घंटागाड्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे संबंधित अधिकार्‍यांनी नेहमीच दुर्लक्ष केले. शिवाय आवश्यकतेनुसार नवीन घंटागाड्या खरेदी करण्यासाठी आतापर्यंत महापालिकेतील कोणत्याच सत्ताधार्‍यांनी प्रयत्न केले नाहीत.
वर्षभरापूर्वी माजी महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात दोन कंटेनर खरेदी करण्यात आले. परंतु नवीन कंटेनर येताच जुन्या दोन कंटेनरपैकी एक कंटेनर बंद पडला. त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीच कार्यवाही झाली नाही. महापौर संग्राम जगताप यापूर्वी महापौर असताना त्यांनी 9 ट्रॅक्टर खरेदी केले होते. त्यांचीही आता दुरवस्था झाली आहे. काही ट्रॅक्टर पंर झाले आहेत, तर काहींना अक्षरश: गंज चढला आहे. तीनपैकी एक डोझर अनेक दिवसांपासून बंद आहे. ही वाहने कमी पडत असल्याने मनपाने 4 डंपर भाडेतत्त्वावर घेतले आहेत. त्यांचीदेखील अशीच अवस्था आहे.
वाहनेच नाही, तर कर्मचार्‍यांचीदेखील मोठय़ा प्रमाणात वानवा आहे. वाहनांसाठी सुमारे 40 चालकांची कंत्राटी पध्दतीने नेमणूक करण्यात आली आहे. परंतु वाहनेच कमी असल्याने चालक तरी काय करणार? आहे त्या वाहनांच्या माध्यमातून जमेल तेवढा कचरा ते उचलत आहेत.
शहरात दररोज सुमारे 110 ते 120 टन कचरा जमा होतो. परंतु कुचकामी यंत्रणेमुळे त्यापैकी केवळ 70 ते 80 टक्के कचरा दररोज उचलला जातो. त्यामुळे शहरातील विविध भागात कचर्‍याचे ढीग साचले आहेत. मोकळे भूखंड, संरक्षक भिंती, रस्ते, उद्याने, ओढे-नाले, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचराच कचरा पसरला आहे. मोकाट जनावरे व कुत्री कचर्‍यांचे ढिगारे पसरून देतात. वार्‍यामुळे कचरा सर्वत्र पसरला जातो. काही ठरावीक भागात (नगरसेवकांच्या र्मजीतल्या) मोजक्या कचराकुंड्या आहेत, परंतु त्यादेखील महिनाभर रिकाम्या होत नाहीत. अनेक कचराकुंड्यांमधील कचरा सध्या ओसंडून वाहत आहे.

येथे नगरसेवकांची मर्जी चालते..
एरवी या-ना त्या कामात लुडबूड करणारे काही नगरसेवक कचरासंकलनाच्या कामातही आपला अधिकार वापरतात. परंतु हा अधिकार केवळ आपल्या र्मजीतल्या भागासाठीच वापरला जातो. त्यामुळे नगरसेवक सांगतील त्याच भागात घंटागाडी जाते, इतर भागात मात्र घंटागाडी फिरकतही नाही. काही ठिकाणी तर घंटागाडीवाले संबंधित भागातील नागरिकांकडून अनधिकृतरित्या महिना पन्नास रुपये वसूल करतात.
कचरा उचलणार्‍या काही छोट्या वाहनांचीही अवस्था दयनीय झाली आहे.

एरवी या-ना त्या कामात लुडबूड करणारे काही नगरसेवक कचरासंकलनाच्या कामातही आपला अधिकार वापरतात. परंतु हा अधिकार केवळ आपल्या र्मजीतल्या भागासाठीच वापरला जातो. त्यामुळे नगरसेवक सांगतील त्याच भागात घंटागाडी जाते, इतर भागात मात्र घंटागाडी फिरकतही नाही. काही ठिकाणी तर घंटागाडीवाले संबंधित भागातील नागरिकांकडून अनधिकृतरित्या महिना पन्नास रुपये वसूल करतात.