आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sommaya Julu Speaking Abour Forest Dweller People

त्याग केल्याशिवाय कोणतेही चांगले कार्य करणे अशक्य- सोमय्या जुलू यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- समाज उभारण्यासाठी समाजात जावे लागते. वनवासींचे जीवन सुखमय व आनंदी बनवण्यासाठी त्यांच्यात स्वाभिमान व आत्मविश्वास जागवण्यासाठी वनवासी भागात जाऊन त्यांच्यात सामील होऊन कार्य करणारे वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात त्यांच्या विचारमूल्यांची नितांत गरज आहे. त्यागाशिवाय चांगले कार्य करणे अशक्य असते, हा त्यांचा आदर्श स्वीकारा, असे आवाहन अखिल भारतीय वनवासी कल्याण आर्शमाचे संघटनमंत्री सोमय्या जुलू यांनी रविवारी येथे केले.

सावेडीतील सर्मथ विद्यामंदिर प्रशालेच्या प्रांगणात वनवासी कल्याण आर्शमाच्या नगर शाखेतर्फे वनयोगी बाळासाहेब देशपांडे जन्मशताब्दी व वनवासी कल्याण आर्शम षष्ठय़ब्दीपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जुलू बोलत होते. संस्कृती, धर्म, परंपरा जोपासणारा भारत जगाचे रक्षण करू शकेल. त्यासाठी वनवासी बांधवांनी जोपासलेली संस्कृती भविष्यात महत्त्वाची ठरेल.

पैसा व भौतिक सुखांच्या मागे न धावणारा, त्यात समाधान मानणारा वनवासी बांधवांचा विकास करण्यासाठी त्यांची जीवनपद्धती, आदरातिथ्य अनुभवण्यासाठी एकदा तरी त्यांच्यात जाऊन, राहून त्यांना प्रेम व आपलेपणा देण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, प्रांत सचिव जयंत काळे, नगर जिल्हाध्यक्ष मेघश्याम बत्तीन, शहराध्यक्ष प्रशांत मोहोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वनवासी आर्शमाच्या कार्याची माहिती जिल्हा सचिव अभय गोले यांनी दिली. कार्यक्रमाला अरविंद पारगावकर, शरद क्यादर, डॉ. गिरीश कुलकर्णी, अरविंद चन्ना आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्या पटवर्धन व संगीता सोनटक्के यांनी केले. आभार शहर सचिव अभय महाळगी यांनी मानले. अनुप्रिया देशमुख यांनी पसायदान म्हटले.

वनवासींना ओळख देणार
पुरातन काळापासून इंग्रज राजवटीपर्यंत वनवासी बांधवात गैरसमज पसरवून त्यांना वेगळे करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न झाले. आता त्यांच्यात जागृती होत असून त्यांना स्वत:ची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नांत आपण हातभार लावावा. या जन्मशताब्दी वर्षात 3000 गावांमध्ये आरोग्य शिबिरे होणार आहेत. 14 लाख झाडे लावण्यात आली. शासकीय मदतीशिवाय 1300 पूर्णवेळ कार्यकर्ते काम करत आहेत. वनवासी बांधवांना शिक्षण, आरोग्यसेवा देऊन त्यांचा आर्थिक विकास करण्याचे काम सुरू राहील, असे जुलू या वेळी म्हणाले.