आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्यात लाेखंडी गज मारून वडिलांचा खून; आरोपी मुलास अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव- पाइपलाइनच्या पाण्याचे बारे का फोडले हे विचारल्याचा राग आल्याने मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी गज मारून खून केला. ही दुर्घटना तालुक्यातील जुने दहिफळ येथे गुरुवारी घडली. तुकाराम रामभाऊ कारगुडे (६०) असे मृताचे नाव आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. 


गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मृत तुकाराम कारगुडे हे शेतात पाहणी करीत असताना त्यांनी पाइपलाइनचे बारे का फोडले अशी विचारणा मुलगा नवनाथ तुकाराम कारगुडे याला केली. याचा राग आल्याने आरोपी नवनाथ याने वडिलांना शिवीगाळ करून लोखंडी गजाने मारहाण केली. यावेळी आरोपीचे चुलते ज्ञानदेव रामभाऊ कारगुडे घटना स्थळाकडे येताना दिसल्यावर आरोपी पळून गेला. त्यानंतर ज्ञानदेव कारगुडे यांनी सुभाष लाेखंडे यांच्या पिकअपमधून तुकाराम कारगुडे यांना शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. औषधोपचार करण्यापूर्वीच ते मृत झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी आरोपीचा भाऊ सीताराम तुकाराम कारगुडे याने शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी नवनाथ कारगुडे यास पोलिसांनी अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...