आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनोग्राफीचालकांचा आज बंद, आयएमएने दिला आंदोलनाला पाठिंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गर्भधारणापूर्व प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या जाचक अतार्किक तरतुदींच्या विरोधात इंडियन रेडिओलॉजी इमेजिंग असोसिएशनच्या (आयआरआयए) नगर शाखेच्या वतीने बुधवारी (९ डिसेंबर) बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये स्त्रीरोग संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन सहभागी होणार आहे, अशी माहिती नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. धनंजय वाघ यांनी दिली.
गर्भलिंग निदानाच्या आधारे स्त्री भ्रूणहत्या करण्याच्या कृतीचा सर्व सोनोग्राफीधारक विरोध करतो. या बंदमुळे रुग्णांचे काही प्रमाणात हाल होणे शक्य असले, तरी हा बंद रुग्णांच्या विरोधात नसून कायद्यातील जाचक तरतुदींच्या विरोधात आहे. पुण्यात ७, असा तीन दिवस बंद पाळण्यात येणार असून, आयआरआयएच्या राज्यातील सर्व शाखांच्या माध्यमातून बुधवारी बंद पाळण्यात येणार आहे, असे डॉ. वाघ यांनी सांगितले.

आयआरआयएच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला स्त्रीरोग संघटनेचा (फॉक्सी) पाठिंबा असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत झेंडे सचिव डॉ. सचिन होडशीळ यांनी सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशननेही या बंदला पाठिंबा दर्शवला असल्याचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुनोत सचिव डॉ. सी. डी. मिश्रा यांनी स्पष्ट केले.

गर्भधारणापूर्व प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या माध्यमातून गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. परंतु गंभीर गुन्हा माहिती संकलन प्रक्रियेसारख्या कागदोपत्री किरकोळ त्रुटींसाठी एकच शिक्षा असू नये. काहीजणांच्या चुकीची शिक्षा सर्वांना भोगावी लागणे चुकीचे आहे. त्यामुळे सरसकट सर्व डॉक्टरांना क्षुल्लक कागदपत्रांच्या त्रुटींसाठी नाहक त्रास होऊ नये, यासाठी हा बंद पुकारण्यात येणार आहे, असे नगर शाखेचे सचिव डॉ. संदीप वाबळे म्हणाले.
या बंदमध्ये असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सुहास घुले, डॉ. पोपट कर्डिले, डॉ. अशोक काळे, डॉ. रवींद्र कवडे आदींनी केले.
बातम्या आणखी आहेत...