आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये अत्याधुनिक थॅलेसिमिया सेंटरची उभारणी करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- थॅलेसिमिया रुग्णांसाठी रक्त, औषधे, तपासणी, डॉक्टर्स व भोजन उपलब्ध होईल असे अत्याधुनिक सेंटर उभारण्याचा मानस उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला आहे. रुग्णांच्या औषधीसाठी दरमहा ११ हजार रुपयांची मदत फिरोदिया एज्युकेशन ट्रस्टकडून करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
थॅलेसिमिया सोसायटी आॅफ नगरतर्फे थॅलेसिमियाग्रस्त रुग्ण, पालक, ब्लड बँक प्रतिनिधी, औषधी संघटना, डॉक्टर्स, दानशूर व्यक्ती व रक्तदाते यांच्या एकत्रित जिल्हास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आयएमएसचे सरसंचालक डॉ. शरद कोलते, मर्चंट बँकेचे संस्थापक हस्तीमल मुनोत, एल अँड टी कंपनीचे सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर, नोबेल हॉस्पिटलचे विजय निकम, सीए रमेश फिरोदिया, सीए संघटनेचे अजय मुथा, डॉ. विवेक देशपांडे, पुण्याच्या रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड, उद्याेगपती दिलीप कर्नावट, डॉ. सुनील पंडित, अशोक जैन आदी यावेळी उपस्थित होते. स्वर्गीय अनुमय राजकुमार दिवाण याच्या स्मरणार्थ गेली १४ वर्षे अविरतपणे रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या राजकुमार दिवाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद््घाटन करण्यात आले. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी, थॅलेसिमिया रुग्णांना एकाच छताखाली त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक सेंटरसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. कोलते यांनी रक्तदान ही सामाजिक चळवळ म्हणून पुढे येण्याची आवश्यकता व्यक्त केली. मुनोत यांनी चांदमल मुनोत ट्रस्टच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पारगावकर यांनी एल अँड टी कंपनीचे वैद्यकीय पथक थॅलेसिमिया रुग्णांसाठी शासकीय योजनांचा पाठपुरावा करेल, असे आश्वासन दिले. डॉ. देशपांडे यांनी थॅलेसिमिया रुग्णांच्या मोफत सेवेसाठी सदैव तयार असल्याचा शब्द दिला. सूत्रसंचालन जयंत येलूलकर यांनी, तर आभार चेतन विजय गुगळे यांनी मानले. थॅलेसिमिया रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आदी यावेळी उपस्थित होते. प्रवीण आहुजा, अरुण दामले, विनोद दिवाण, अय्युब शेख, रफिक पटेल, इशरत शेख, जेबा शेख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

रक्त देण्याचा संकल्प
आएमएस संस्थेचे प्रा. ज्ञानेश कुलकर्णी यांनी यापुढे संस्थेच्या वतीने थॅलेसिमिया रुग्णांसाठीच रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा संकल्प जाहीर केला. युवान संघटनेचे अध्यक्ष संदीप कुसाळकर यांनी राष्ट्रीय युवा शिबिरानिमित्त १७५ रक्तपिशव्या या रुग्णांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले, तर विजय रुद्रवार यांनी ८० रक्तपिशव्या संकलित करून थॅलेसिमिया रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचा संकल्प या मेळाव्यात केला.