आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात खरिपाच्या ३५ टक्के पेरण्या पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाच्या समाधानकारक पेरण्या झाल्या. मंगळवारपर्यंत ३५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी ३० जूनअखेर अवघ्या हजार ६६७ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरी ३८२.१४ मिलिमीटर पाऊस झाला होता. कमी पावसामुळे खरिपाच्या लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ लाख ७८ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. कमी पावसामुळे सुमारे लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. यंदा मात्र जूनपासून पावसाला सुरुवात झाली. १५ जूनपर्यंत िजल्ह्याच्या बहुतांशी भागात पाऊस झाल्याने पेरण्या झाल्या. त्यानंतर मात्र तब्बल पंधरा दिवसांपासून पाऊस थांबला आहे. मंगळवार अखेरपर्यंत जिल्ह्यातील लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा आहे.
कोपरगाव, पाथर्डी, संगमनेर या भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागातील पेरण्या रखडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेरण्या समाधानकारक झाल्या आहेत. गेल्या वर्षी जूनअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने अवघ्या हजार ६६८ हेक्टरवर पेरण्या झाल्या. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने केवळ १३.९३ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. जून ते ऑक्टोबर या कालावधीत ४९७ मिलिमीटर सरासरीच्या तुलनेत ३८२.१४ मिलिमीटर पाऊस झाल्याने केवळ लाख ७८ हजार २०० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. खरिपाच्या पेरण्या समाधानकारक झाल्याने तृणधान्याच्या उत्पादनात ६९ टक्क्यांनी घट झाली होती. कडधान्यांच्या उत्पादनात ८१ टक्क्यांनी घट झाली. अन्नधान्यांच्या उत्पादनात ६९ टक्क्यांनी घट झाली. यंदा मात्र जून महिना अखेरपर्यंत जिल्ह्यात खरिपाच्या ३५ टक्के पेरण्या झाल्याने उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज आहे.
यंदा मका, मूग, उडीद, तेलबिया कपाशीची चांगली पेरणी झाली अाहे. ज्वारीच्या क्षेत्रावर मात्र अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत. तृणधान्याच्या २२ टक्के, कडधान्य ८१ टक्के, अन्नधान्यांच्या ३०.५६ टक्के, तेलबियांच्या ३४ टक्के कापसाच्या ५८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या समाधानकारक झाल्या असल्या, तरी आठवड्याभरात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यास या पिकांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.

खरिपाच्या क्षेत्रात वाढ
जिल्ह्यातजून महिन्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानाकारक पेरण्या झाल्या आहेत. यंदा खरिपाच्या क्षेत्रात २५ टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज आहे. येत्या चार-पाच दिवसांत पुन्हा पाऊस सुरू झाल्यास पेरण्या आणखी वाढतील.'' अंकुशमाने, कृषी अधीक्षक.

अशी आहे पेरण्यांची स्थिती
- भात४.५ बाजरी २१.३३
- मका ३४.५६ तूर ४५.११
- मूग ११६.२४ उडीद १३७
- भुईमूग ३८.२३ तीळ ३.२४
- सोयाबीन ५३ कापूस ५८.२६