आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Story On Aurangzeb History In Ahmednagar

औरंगजेबाच्या अखेरच्या दिवसातील साक्षीदार असलेले शहर, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- तब्बल 49 वर्षे हिंदुस्तानवर राज्य करणा-या औरंगजेबाचे अखेरचे तेरा महिने भिंगारमध्ये व्यतित झाले. नगर हे तेव्हा जणू देशाची राजधानीच बनले होते. अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार होण्याची संधी तेव्हा या शहराला मिळाली. याच मातीत वयाच्या 89 व्या वर्षी औरंगजेबाने अखेरचा श्वास घेतला. मोगल साम्राज्याचा डोलारा त्या क्षणापासून ढासळायला सुरूवात झाली... हे सगळं जिथं घडलं, त्या आलमगीरला रविवारी "सिटी वॉक'अंतर्गत भेट देऊन इतिहासात डोकावण्याची संधी नगरकरांना मिळाली. लेखक मेधा देशमुख-भास्करन, प्रा. नामदेव जाधव आदी मान्यवर या उपक्रमात सहभागी झाले.
आयुष्यातील अखेरची २६ वर्षे औरंगजेबाने दख्खनच्या मोहिमेवर खर्च केली. 1681 मध्ये सुरू झालेली ही मोहीम 1707 मध्ये संपली ती औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच. या काळात घडणाऱ्या घडामोडींचं महत्त्वाचं केंद्र होतं अहमदनगर. औरंगजेबाचं 1683 मध्ये नगरला आगमन झालं, तेव्हा मोगल सैन्याची पाच लाखांची छावणी भिंगारपासून चार मैल अंतरापर्यंत पसरली होती. नंतर औरंगजेबाने विजापूर, गोवळकोंडा घेतला, पण मराठ्यांचं स्वराज्य नेस्तनाबूत करणं त्याला शक्य झालं नाही. संताजी, धनाजीसारख्या शूरवीरांनी मोगलांची रसद तोडून, गनिमी काव्याने हल्ले करून त्यांना जेरीस आणलं. शेवटी कंटाळलेला औरंगजेब परतीच्या प्रवासला निघाला. जानेवारी 1706 मध्ये तो नगरला आला, तेव्हा आपली अखेर जवळ आल्याचं त्याला जाणवलं. "ये मेरा आखरी मुकाम है...' असे उद््गार त्याच्या मुखातून निघाले. नगरच्या मातीतच फेब्रुवारी 1707 मध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला.
औरंगजेबाचे पार्थिव त्याच्या इच्छेप्रमाणे दफनासाठी खुलताबादला नेण्यापूर्वी जिथे त्याला स्नान घालण्यात आले तो चौथरा, बादशहाचा दरबार जिथे भरत असे ती बारादरी, तेथील संग्रहालयात असलेल्या कुराणाच्या दुर्मिळ प्रती, रयतेला दर्शन देण्यासाठी बादशहा जिथे बसे ती मेघडंबरी, मशीद व कारंजी, मशिदीच्या तळघरात असलेली बादशहाची विश्रांतीची जागा अशा अनेक गोष्टी पाहताना इतिहासात डोकावल्याचा आभास होत होता. आलमगीरची तटबंदी, बुरूज, प्रवेशद्वार, तसेच मलग्या अजून सुस्थितीत आहेत.
औरंगजेबचा आणखी इतिहास वाचा पुढील स्‍लाईडवर...