आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sport Rally News In Marathi, Ajay Pawar Speaking Issue At Nagar, Divya Marathi

मैदानी खेळ खेळा म्हणजे तब्येत राहील ठणठणीत-अजय पवार यांचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मैदानी खेळ खेळा, भरपूर व्यायाम करा म्हणजे तुमची तब्येत ठणठणीत राहील, असा सल्ला क्रीडा मार्गदर्शक अजय पवार यांनी दिला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित क्रीडावर्धिनीचे वासंतिक क्रीडा शिबिर 12 ते 30 एप्रिलदरम्यान झाले. या शिबिराचा समारोप प्रमुख करताना ते बोलत होते. याप्रसंगी मुख्याध्यापक गजानन वनारसे, मुख्याध्यापिका अलका जोशी, शिरीष चाटे आदी उपस्थित होते.
या शिबिरात खो-खो, मल्लखांब, क्रिकेट या खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी विविध खेळ व उपक्रमांचा समन्वय साधण्यात आला. तज्ज्ञ शिक्षक राजेश भालसिंग, शिरीष चाटे, महादेव मगर यांनी शिबिराच्या यशस्विततेसाठी विशेष पर्शिम घेतले.संस्थेचे अध्यक्ष अभय क्षीरसागर, शैलेश आपटे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.