आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांघिक शक्तीच्या बळावर यश हमखास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जीवनात जय-पराजय होतात. पण खिलाडू वृत्ती आवश्यक असते. आपण कोणत्या पद्धतीने पराजय स्वीकारतो, हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळी विजय मिळेलच असे नसते. त्यामुळे पराजय पचवण्याची शक्ती आपल्यात असावी. शिस्तीच्या जोडीला सांघिक शक्ती असेल, तर यश हमखास मिळते, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी केले. पोलिस कवायत मैदानावर सुरू असलेल्या पोलिस क्रीडा स्पर्धेचे उदघाटन त्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून हवेत फुगे सोडून झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, संजय जाधव, सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित इतर अधिकारी उपस्थित होते. उदघाटनापूर्वी स्पर्धेत सहभागी झालेल्या नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर संघातील खेळाडूंनी उपस्थितांना मानवंदना दिली. यावेळी प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश कुलकर्णी म्हणाले, महाराष्ट्र पोलिस दल देशात नावाजलेले असून अत्यंत कार्यक्षम म्हणून अोळखले जाते. अशा प्रकारच्या स्पर्धेमुळे खेळाडू पोलिसांना चांगली संधी मिळाली आहे.

पोलिस दलात सांघिक भावनेला अधिक महत्त्व आहे. ताणतणाव मुक्त होण्यासाठी खेळ हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे मन सुदृढ होऊन मानसिक ताण कमी होतो, असे सांगत कुलकर्णी यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस अधीक्षक त्रिपाठी यांनी स्पर्धेचे प्रास्ताविक केले. पोलिस हे शरीराने, मनाने बुद्धीने तंदुरुस्त राहावेत, यासाठी त्यांच्यात खिलाडू वृत्ती निर्माण होण्याची गरज असते. पोलिसांनी आपले कर्तव्य प्रभावीपणे पार पाडावे, यासाठी दरवर्षी स्पर्धांचे आयोजन केले जाते, असेही सांगितले.

यंदाच्या परीक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील ६९० स्पर्धकांनी भाग घेतला आहे. विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडूंनी उत्तुंग यश संपादित करावे. तसेच या स्पर्धांच्या समारोपप्रसंगी विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले अाहेत. उदघाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड गीता कळमकर यांनी केले, तर आभार अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी मानले. ही स्पर्धा २२ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. अखेरच्या दिवशीच सायंकाळी पोलिस कवायत मैदानावर स्पर्धेचे पारितोषिक वितरण होईल.
पोलिस क्रीडा स्पर्धेचे उद््घाटन करताना जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी.
बातम्या आणखी आहेत...