आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचपुतेंच्या विरोधात काष्टीतून गिरमकर?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदा - जिल्हा परिषदेच्या काष्टी गटातून काँग्रेसच्या बेबीताई गिरमकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीला सक्षम उमेदवार मिळत नसल्याने अस्वस्थ असणा-या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांनाच रिंगणात उतरवण्यासाठी मोठा रेटा लावला आहे.
त्यातच विरोधकांनी या लढतीसाठी आव्हान दिल्याने राष्ट्रवादीत या लढतीचा गांभिर्याने विचार सुरू झाला आहे. विद्यमान सदस्य व जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती बाळासाहेब गिरमकर यांचे पत्नीच्या विरोधात काष्टी गटात राष्ट्रवादीकडे सध्या तरी सक्षम उमेदवार नाही. पालकमंत्री पाचपुते यांच्या गैरहजेरीत तालुक्यात मोठा संपर्क परिक्रमाच्या अध्यक्षा प्रतिभा पाचपुते यांचा आहे. जर स्वत:च्या गटात प्रबळ उमेदवार नसेल, तर त्यांनीच उमेदवारी करावी अशी मागणी मध्यंतरी पुढे येताच सदाशिव पाचपुते यांनी घरातील पालकमंत्री वगळता कोणीही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करून या विषयाला पूर्णविराम दिला होता. पण प्रमुख कार्यकर्त्यांनीही गरज पडल्यास हाच निर्णय घ्यावा लागेल, असा सल्ला दिल्याने आता त्यावर राष्ट्रवादीतही गांभिर्याने चर्चा सुरू झाली आहे.
आदेश आल्यास उमेदवारी दाखल करु - पक्षाला माझ्या उमेदवारीची गरज भासल्यास व तसा आदेश कुंटुंबातून आल्यास काष्टीतून उमेदवारी करणार आहे. विरोधकांनी त्यासाठी आव्हान दिले असले तरी मला घरचा आदेश महत्वाचा वाटतो. उमेदवारीचे निश्चित झाले तरी वेगळा प्रचार करण्याची गरज भासणार नाही, कारण दादा येथे नसताना सतत लोकांच्या सुख-दुखा:त सहभागी असते. जे कधीच बाहेर पडत नाहीत त्यांना प्रचाराला फिरण्याची गरज आहे. - प्रतिभा पाचपुते, अध्यक्षा परिक्रमा.
राष्ट्रवादीची सावध भूमिका - दरवेळी निवडणुकीचे नियोजन करणारे प्रमुख कार्यकर्ते काँग्रेसमध्ये गेल्याने पाचपुते गट आता कोणताच धोका पत्करण्यास तयार नसून निवडून येण्याची क्षमता असणाराच उमेदवार काष्टीतून देणार असल्याने प्रतिभा पाचपुते यांच्याच नावावर त्यामुळे शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.