आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगोंद्यात आठ जणांची उमेदवारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदा - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी श्रीगोंद्यात गुरुवारी आठजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात मांडवगण गटातून राष्ट्रवादीचे सचिन जगताप यांनी, तर हंगेवाडी गणातून काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांनी अर्ज दाखल केले. दोन दिवसांत 171 जणांनी 308 अर्ज खरेदी केले.
आतापर्यंत संतोष दरेकर(आढळगाव गण), सिद्धेश्वर देशमुख (मांडवगण गट), संजय आनंदकर (मांडवगण गण), रावसाहेब वाणी (भानगाव गण), शुभांगी नलगे (काष्टी गट) तसेच सचिन जगताप व बाळासाहेब उगले यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केले. जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीच्या बारा गणांसाठी दोन दिवसांत तालुक्यात 171 जणांनी 308 अर्जांची खरेदी केली.
आचारसंहितेची कडक अंमलबजावणी - निवडणूक काळात आचारसंहितेचे पालन करण्यासाठी सर्वांना सूचना दिल्या आहेत. त्यासाठी कठोर अंमलबजावणीही केली जाईल. पालिका हद्दीतही ही आचारसंहिता लागू असून नियमांचे उल्लंघन करणा-यास प्रथम समज देऊ. मात्र, नंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’’ -अजय मोरे, निवडणूक निर्णय अधिकारी.