श्रीरामपूर- शहरासहतालुक्यात अजूनही अनेक नागरिक आधार कार्ड नोंदणीपासून वंचित आहेत. याचे सर्वेक्षण करून कार्ड घेतलेल्या नागरिकांसाठी मोफत आधार कार्ड नोंदणीची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी भाजपच्या शहर शाखेतर्फे करण्यात आली.
तहसीलदार किशोर कदम यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. तालुक्यात अद्याप ३५ टक्के नागरिकांनी आधार कार्ड काढलेले नाही. शासनाच्या विविध योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनाही आधार कार्ड सक्तीचे करण्यात आल्याने नागरिकांना आधार कार्डसाठी धावपळ करावी लागत आहे. सेतू कार्यालयात ठेकेदारामार्फत आधार कार्ड काढण्यासाठी नागरिकांची लूट अडवणूक केली जात आहे. नागरिकांची आधार कार्डची मागणी अधिक असल्याने त्यांना मोफत कार्ड काढण्याची मोहीम सुरू करून त्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी निवेदनात भाजपचे शहराध्यक्ष मारुती बिंगले, सतीश सौदागर, संजय यादव, विजय लांडे, संदीप वाघमारे, सतीश नागरे, रवी बोराडे, शेखर आहेर, उमेश धनवटे, आदेश मोरे आदींनी केली आहे.
श्रीरामपूर येथे आधार कार्ड काढण्यासाठी मोहीम राबवण्यात यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार किशोर कदम यांना देताना भाजपचे शहराध्यक्ष मारुती बिंगले, सतीश सौदागर, संजय यादव आदी.