आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामपूर येथील 49 भाविक उत्तराखंडमध्ये अद्यापही बेपत्ता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - श्रीरामपूर येथील अंबिका ट्रॅव्हल्ससमवेत केदारनाथला गेलेल्या 120 भाविकांपैकी संचालक शेखर कुलकर्णी यांच्यासह 49 भाविक अजून बेपत्ता आहेत. 65 भाविक सुरक्षित परतले आहेत. ट्रॅव्हल्सचे संचालक अनंतराव कुलकर्णी यांच्यासह आणखी 6 जण उत्तराखंडमध्ये थांबून बेपत्ता भाविकांचा शोध घेत आहेत.

नेवासे तालुक्यातील चांदा येथील गुरुदत्त ट्रॅव्हल्सचे सर्व 55 भाविक सुखरूप परतले. अंबिका ट्रॅव्हल्सतर्फे गेलेल्या बेपत्ता भाविकांमध्ये परभणीचे 21, औरंगाबादचे 9, जालन्याचे 10, नांदेडचे 4, तर सेलू, लातूर येथील प्रत्येक 1 भाविकाचा समावेश आहे.

खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंबिका ट्रॅव्हल्स व गुरुदत्त ट्रॅव्हल्सच्या मराठवाड्यातील भाविकांची भेट घेऊन विचारपूस केली. मंत्री सुरेश धस हे राज्य सरकारच्या वतीने ऋषिकेश येथे बेपत्ता भाविकांच्या शोधात आहेत.