आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवा आदेश: कमी उत्पन्न देणार्‍या एसटी वाहक-चालकांची होणार बदली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कमी उत्पन्न देणार्‍या वाहक-चालकांची बदली करण्यात येईल. ते सोलापूरच्या हवामानात काम करण्यास योग्य नसल्याचे कारण देत ही कारवाई होईल, असा आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सोलापूर आगाराने काढला आहे.
मागील काही दिवसांपासून सोलापूर आगाराचे उत्पन्न कमी होत आहे. अनेक चालक-वाहक नेमून दिलेले काम नीटपणे पूर्ण करत नाहीत. त्यामुळे ही शक्कल लढवल्याचे एसटी प्रशासनाचे सांगणे आहे. आगारात 275 चालक व 301 वाहक आहेत. आगाराच्या 130 गाड्या आहेत. त्यात अनेक गाड्या लांबपल्ल्याच्या आहेत. चालक -वाहकांच्या कामात पारदर्शकता व सुसूत्रता यावी म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्याचे सात गट बनविण्यात आले आहे. 15 -15 दिवसाच्या अंतरानंतर गटाचे ठिकाण बदलण्यात येते. कामे नीट करा अन्यथा बदली करण्यात येईल, अशी नोटीस व्यवस्थापकांच्या सूचनेवरून काढण्यात आली आहे. नव्याने तयार केलेल्या या गटपद्धतीमुळे अनेक कर्मचार्‍यांत असंतोष वाढत आहे. काही कामगार संघटनांनीही याला विरोध केला आहे.
हीच कामाची पद्धत
चालक-वाहकांचे गट बनवणे ही आमच्या कामाची पद्धत आहे. त्यांच्या कामात सुधारणा आणण्यासाठी ती अमलात आणलेली आहे. विवेक हिप्पलगावकर, आगार व्यवस्थापक
आम्ही विरोध करू
चालक -वाहकांच्या गट पद्धतीला आमचा विरोध आहे. यामुळे काही चालकांना लांबचे काम मिळते, काहींना जवळचे. त्यामुळे अनेक चालक-वाहक यावर नाराज आहेत. आम्ही त्याला कडाडून विरोध करू. र्शीकांत शड्डू, राज्य सहसचिव, इंटक