आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटी महामंडळाच्या तारकपूर बसस्थानकात निर्जळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- एसटी महामंडळाच्या तारकपूर बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तहानलेले प्रवासी पाण्यासाठी बसस्थानकातील कँटीनमध्ये जातात. तथापि, या कँटीनचे नळ कनेक्शनही एस. टी. प्रशासनाने थकबाकी न भरल्याने तोडले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने महागाचे बाटलीबंद पाणीखरेदी करावी लागते. प्रवाशांच्या गैरसोयीमुळे पाणीविक्रेत्यांची चांगलीच चलती आहे.
तारकपूर बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासंदर्भात वारंवार अनेक अडचणी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच ह्यदिव्य मराठीह्णने तेथील पाण्याच्या टाक्यांची पाहणी केली होती. त्यावेळी पाण्याच्या टाकीत कचरा, घाणेरडे कपडे आढळले होते. असे दूषित पाणी प्रवाशांच्या आरोग्यास हानीकारक असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. या टाक्या स्वच्छ झाल्या किंवा नाही, यासंदर्भात 'दिव्य मराठी' टीमने गुरुवारी पुन्हा तारकपूर बसस्थानकाला भेट दिली. त्यावेळी बसस्थानकच्या उजव्या बाजूला असलेल्या नळाला पाणीच नसल्याचे आढळून आले. याबाबत काही कर्मचा-यांशी संपर्क साधला असता, पिण्याचे पाणी बंद असल्याचे सांगण्यात आले. प्रवासी मोठ्या आशेने या नळांपर्यंत यायचे, पण तोटी सुरू केल्यानंतर पाणी न आल्याने निराश होऊन जात होते. काही प्रवाशांशी चर्चा केली असता, त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने करण्याची गरज असल्याचे सांगितले.
पंप नादुरुस्त झाल्याने अडचण
बसस्थानकात पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचा पंप नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे पाण्याची अडचण झाली आहे. नादुरुस्त पंप तातडीने दुरुस्त करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल. बसस्थानकातील कँटीन व्यावसायिकांनी नियमानुसार कँटीन सुरू केल्यानंतर सहा महिन्यांतच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे, पण तशी व्यवस्था कोणीही केलेली नाही. प्रत्येक कँटीन चालकाला सुमारे १ हजार २०० रुपये पाणीपट्टी आकारली जाते. तसेच एस. टी. कडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची पाणीपट्टीही थकली आहे. त्यामुळे कँटीनचे नळ कनेक्शन आम्ही तोडले आहे.ह्व प्रमोद नेहुल, आगार व्यवस्थापक, तारकपूर