आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक रुपयात विक्री करा बसस्थानकावर फराळ, महिला बचतगटांसाठी एसटी महामंडळाची योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दिवाळीच्या वस्तू फराळ अल्पदराने विक्री करणाऱ्या महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करण्यात आली आहे. बचत गटांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसस्थानकावर अवघे एक रुपया इतके नाममात्र शुल्क आकारून जागा उपलब्ध करून देणार आहे. तशी घोषणा परिवहन खारभूमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. 
 
दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वस्तू फराळ विक्रीची अनेक दालने बाजारात सध्या लागलेली आहेत. त्यामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूला फराळाच्या जिन्नसाला गुणवत्ता किफायतशीर दरामुळे ग्राहकांकडून मागणी असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा बचतगटांना बसस्थानकाच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांना सहज ग्राहक उपलब्ध होऊन त्यांच्या विक्रीस प्रोत्साहन मिळेल. या हेतूने अनेक महिला बचत गटांनी बसस्थानकांवर दिवाळीच्या वस्तू फराळ विक्री करण्यासाठी दालन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार एसटी महामंडळाने दिवाळी भाऊबीज भगिनी सन्मान योजना आखली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक बसस्थानकावर जागेच्या उपलब्धतेनुसार शंभर चौरस फुटाचे एक दालन, याप्रमाणे कमाल पाच दालने प्रत्येकी रुपये एक एवढे शुल्क आकारून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. अर्जदार महिला बचत गटांना ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीसाठी ही दालने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. 
 
लाभदायक योजना 
बचतगटांनाबसस्थानकाच्या ठिकाणी जागा उपलब‍ध करून दिल्यास त्यांना सहज ग्राहक उपलब्ध होऊन त्यांच्या विक्रीस प्रोत्साहन मिळेल. तसेच ग्राहकाला देखील घरी जाता जाता दिवाळीच्या वस्तू फराळ घेऊन जाणे सहज शक्य होईल. या हेतूने अनेक महिला बचत गटांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ०२४१ -२४१६६०१/२४१६६०३ या क्रमांकावर असे राज्य परिवहन अहमदनगर विभागाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...