आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निळवंडेच्या कालव्यांसाठी केंद्र राज्याचा निधी देऊ; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफी योजनेत आवश्यक ते बदल करून शेतकऱ्यांच्या सूचनांचा आंतर्भाव करण्यात येईल आणि या कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचे सांगतानाच नगर, नाशिक जिल्ह्यांतील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामाला केंद्राचा राज्याचा निधी उपलब्ध करून कालव्याचे पाणी तीन-चार वर्षांत जिरायत भागातील शेतीला उपलब्ध करून देण्याची ग्वाही देतानाच साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार साईसंंस्थान यांच्या एकत्रित सहभागातून शिर्डीसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यानुसार कामे हाती घणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

शिर्डी नगरपंचायतीच्या अमृत योजनेतून सुमारे ३६ कोटी ७५ लाख रुपये खर्चून वाढीव पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे उपस्थित होते. या कार्यक्रमास जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे, साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, महसूल आयुक्त महेश झगडे, अभय शेळके, नगराध्यक्षा योगीता शेळके, उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, साई संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे, शिवाजी गोंदकर, विजय वहाडणेे, राजेश परजणेे, पोलिस आयुक्त विनय कुमार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले की, देशातील शहरे छोट्या शहरांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य भूमिका घेऊन अमृत योजना अस्तित्वात आणली. या योजनेसाठी दोन हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. नाशिकचा कुंभमेळाही माझ्याच कारकिर्दीत झाला. आता साई समाधी शताब्दी सोहळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्याची संधी मला मिळणार आहे. साईसंस्थानचीही मदत घेऊन शिर्डी शहरात पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली, िळवंडे धरणाच्या कालव्याचा प्रलंबित प्रश्न आम्ही सोडवणार असून साई संस्थानकडून परतीच्या बोलीवर पाचशे कोटी घेणार आहोत. तसेच केंद्राकडून या कालव्याच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून तीन-चार वर्षांत निळवंडेच्या कालव्यांची कामे पूर्णत्वास नेण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नेते स्वर्गीय बाळासाहेब विखे यांचा पाण्याच्या प्रश्नावर दांडगा अभ्यास होता. त्यांनी राज्यातील पाणीप्रश्नावर सुचवलेल्या प्रस्तावांवर विचार करून त्या दृष्टीने सर्वेक्षण करण्याचे काम सरकारने हाती घेतले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचे नियोजन करताना केंद्र राज्याने भरीव मदत करून शिर्डीत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करण्याची मागणी करतानाच निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे प्रलंबित असल्याने जिरायत भागातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यापूर्वीच्या सरकारमधील लोकांनी विखेंना त्रास होईल यासाठीच राजकारण करून कालव्यांची कामे प्रलंबित ठेवली, असा आरोप त्यांनी केला. 

विखेंचे कौतुक 
आपणमुख्यमंत्री या नात्याने मी माझे काम करीत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे त्यांची भूमिका प्रामाणिकपणे बजावत आहेत. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवून लोकशाही मजबूत करण्यात भूमिका विरोधी पक्षनेत्यांची असते, ही भूमिका विखे बजावत आहेत. ते टीकेची झोड उठवतात, तरीही आमच्या मैत्रीत फरक पडला नाही. आमच्या मैत्रीवर आक्षेप घेतले जातात. पण आम्ही आमच्या भूमिकेवर प्रामाणिक असतो. 
बातम्या आणखी आहेत...