आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Employees' Association Demonstrations; 13 From The Strike

राज्य कर्मचारी संघटनेची निदर्शने; 13 पासून संप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचार्‍यांना शैक्षणिक, वाहतूक, राहणीमान भत्ता द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. मागण्यांबाबत विचार न झाल्यास 13 फेब्रुवारीपासून बेमुदत संप करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
जिल्हा राज्य सरकारी नोकर संयुक्त संघाचे सरचिटणीस योगिराज खोंडे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आगाऊ वेतनवाढ व महिला कर्मचार्‍यांना शिफारस केलेली बालसंगोपनाची रजा तातडीने मंजूर करावी, कर्मचार्‍यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, पाच दिवसांचा आठवडा करावा, जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचार्‍यांना लागू करावी, अधिकारी व कर्मचार्‍यांवर हल्ला करणार्‍यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत, सर्व संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावीत, केंद्राप्रमाणे मासिक पेन्शन साडेतीन हजार रुपये द्यावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.