आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शासकीय इतमामामध्ये कोलतेंवर अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - तालुक्यातील माळीबाभूळगाव येथील रहिवासी व बोधेगाव (ता. शेवगाव) दूरक्षेत्रातील पोलिस कर्मचारी मृत दीपक रावसाहेब कोलते (३२) यांच्या पार्थिवावर माळी बाभूळगाव येथे बुधवारी दुपारी साडेबारा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
मुंगी शिवारात मंगळवारी वाळूतस्करांनी प्रभू वाडगाव येथून मोटारसायकलवरून येत असताना धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. बुधवारी दुपारी त्यांचा मृतदेह बाभूळगाव येथे त्यांच्या घरी आणण्यात आला. गावातील सर्व व्यवहार बुधवारी बंद ठेवण्यात आले. मृत दीपक यांच्यामागे आई, वडील, पत्नी, दोन बहिणी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. सजवलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून दीपक कोलते यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यविधीपूर्वी पोलिस दलातर्फे मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करून बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यावेळी रुबाब शेख, वृद्धेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष उध्दव वाघ, शिवशंकर राजळे, "वृद्धेश्वर'चे कार्यकारी संचालक जालिंदर पवार, मिठूभाई शेख, अमोल गर्जे, अनिल महाराज वाळके, तहसीलदार सुभाष भाटे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

ग्रामस्थांनी अडवली अंत्ययात्रा
यावेळी पोलिस अधिका-यांसमोर संतप्त नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त केला. ग्रामस्थांनी काही काळ अंत्यविधी रोखला. आरोपीला त्वरित पकडण्याचे आश्वासन दिल्याशिवाय अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. माजी सरपंच रवींद्र वायकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने भावना व्यक्त केल्या. यावेळी पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.