आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रकार श्रीधर अंभोरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अमरावती येथील मातोश्री स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कवी सुखदेव ठाणके यांच्या 'पिंडपात' श्रीकृष्ण राऊत यांच्या 'तुको बादशाह' या दोन कविता संग्रहावरील उत्कृष्ट मुखपृष्ठांसाठी चित्रकार श्रीधर अंभोरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला.

मातोश्री स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्र पोटे राज्यस्तरीय मराठी वाड्मय पुरस्कार आयोजन समितीने या पुरस्कारांची घोषणा केली. येत्या मंगळवारी (२२ मार्च) अमरावती येथे होणाऱ्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे उपस्थित असतील. रोख पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या मान्यवरांनी अंभोरे यांच्या चित्रशैलीचे कौतुक केले आहे. चित्रकाराबरोबर उत्तम कवीही असलेल्या अंभाेरे यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. प्रतिष्ठेचा फाय फाउंडेशनचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. वाशिम येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या निमंत्रणपत्रिकेचे, स्मरणिकेचे विचारमंचाचे डिझाईन अंभोरे यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...