आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Level Committee Review Water Shortage In Nagar

राज्यस्तरीय पथकाकडून पाणीटंचाईचा आढावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पाणीटंचाईबाबत जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या राज्यस्तरीय पथकाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. नंतर पथकाने पारनेर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावाला भेट दिली.

पाणी पुरवठा विभागाचे उपसचिव महेश सावंत, कक्ष अधिकारी राजेंद्र कुमटगी व वरिष्ठ सहायक राम साबणे या अधिकाऱ्यांच्या पथकाने टंचाईचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी शरद जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील,जि. प. कार्यकारी अभियंता एस. एस. कदम, वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोसकी यांच्याबरोबर सर्व विभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते. जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेला पाऊस, भूजल पातळीतील घट, पाणी टंचाई, टंचाई निवारणार्थ राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आराखडा व त्याची अंमलबजावणी, प्रतिबंधात्मक आराखडा, टँकरवर बसवण्यात आलेली जीपीएस प्रणाली, आवश्यक अनुदान याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.