आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Level Conference Organized By CSRD Organization

बहुजन समाजाने हक्कांसाठी संघटित व्हावे- माजी न्यायमूर्ती सी. एल. थूल यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी बहुजन समाजाने आपल्या हक्कांसाठी संघटित व्हावे, असे आवाहन राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी शनिवारी केले.
सीएसआरडी समाजकार्य व संशाेधन संस्था व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने "मानव अधिकार व सामाजिक बहिष्कृती' या विषयावर आयोजित राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन करताना थूल बोलत होते. मानव अधिकार कार्यकर्ते एकनाथ आव्हाड, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, न्यायाधारच्या संस्थापिका अॅड. निर्मला चौधरी, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे आदी यावेळी उपस्थित होते. थूल म्हणाले, स्त्रियांच्या हक्कांसाठी गौतम बुद्धांनी सर्वप्रथम लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानवाधिकाराचे खरे जनक आहेत. मानवाधिकारात मानव हा केंद्रबिंदू मानला जातो. त्यानुसार व्यक्तीला जीवन जगणे, स्वातंत्र्य, समता व दर्जात्मक अधिकार घटनेने बहाल केले आहेत. स्त्रिया, दलित, आदिवासी यांचा सामाजिक विकास होणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची नियमानुसार अंमलबजावणी करण्याची मानसिकता अजूनही पूर्णपणे तयार झालेली नाही. ही मानसिकता तयार होणे महत्त्वाचे आहे. बहुजन समाजाने आपल्या हक्कांसाठी संघटित होत त्यासाठी प्रयत्न करण्याची अावश्यकता आहे. प्रास्ताविक डॉ. पठारे यांनी केले. स्वागत प्रा. स्नेहल दिवेकर यांनी केले.