आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचा केदार केळकर झाला ‘महाराष्ट्र संगीत भूषण’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - येथील श्रीरामनाथ धूत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय अभिजात शास्त्रीय संगीत गायन स्पर्धेत मुंबईचा केदार केळकर ‘महाराष्ट्र संगीत भूषण २०१७’ चा मानकरी ठरला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राधावल्लभ धूत, श्रीगोपाल धूत, प्रतिभा धूत, रमेश धूत, सुरुची मोहता, परीक्षक चंद्रशेखर वझे, शिवदास देगलूरकर, करूणा देशपांडे, पवन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
डॉ. बोपर्डीकर म्हणाले, अभिजात गायन स्पर्धेची सुरूवात धूत परिवाराच्या माध्यमातून नगर शहरात झाली आहे. अहमदनगरची नवीन ओळख सांस्कृतिक स्मार्ट शहर अशी होत आहे. सैराटच्या युगात या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळणे, ही नक्कीच भूषणावह बाब आहे. या स्पर्धेने सहयाद्रीची उंची गाठली आहे. पुढच्या वर्षी गौरीशंकराची उंची ही स्पर्धा गाठेल. यातून मोठे कलाकार तयार होतील. 

राधावल्लभ धूत म्हणाले, ही स्पर्धा यापुढे गावोगावी घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. परीक्षक वझे, देगलूरकर देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पवन नाईक यांनी केले. सूत्रसंचालन वीणा दिघे उमा देशपांडे यांनी केले. पारितोषिकांचे वाचन सुरूची मेहता पवन नाईक यांनी केले. आभार प्रतिभा धूत यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्विततेसाठी अंगद गायकवाड, आदिती गराडे, हर्षद भावे, प्रसाद सुवर्णपाठकी, रोहित गडकर, शेखर दरवडे, प्रकाश शिंदे, राधिका परदेशी, कल्याण मुरकुटे, मानसी ख्रिस्ती, आदिती गराडे, प्राची पाठक, संज्योत गिरी, आकाश गायकवाड, उध्दव म्हस्के, संकेत गांधी, पंकज नाईक, संगीता मेस्त्री, गोदावरी शिंदे, यशोदा शिंदे, वैष्णवी शिंदे, पल्लवी शिंदे, डॉ. शेख रिजवान, नवरतन वर्मा, भाग्येष बोपर्डीकर, सई शंतनू संत, गोपीनाथ वर्पे, स्नेहल पाटील आदींनी परिश्रम घेतले. 

स्पर्धेचा निकाल : प्रथम- केदार केळकर, मुंबई (गुरू शुभदा पराडकर), द्वितीय - स्नेहल नेवासकर, पुणे (गुरू जयश्री रानडे) 
तृतीय - परिमल कोल्हटकर, पुणे (गुरू डॉ. विकास कशाळकर), उत्तेजनार्थ - प्रथम - मानसी कुलकणी, औरंगाबाद (गुरू शुभदा पराडकर), द्वितीय - प्रिती पंढरपूरकर (गुरू सावनी शेंडे साठये), तृतीय - स्वरूपा बर्वे (गुरू आरती टिकेकर), चतुर्थ - आदिती कोरटकर (गुरू शुभदा पराडकर), पाचवे - सावनी गोगटे (गुरू शुभदा पराडकर), सहावे - प्राजक्ता काकतकर (गुरू प्रतिमा टिळक), सातवे - ओंकार पाटील (गुरू मच्छिंद्र विश्वास बुवा) 
 
बातम्या आणखी आहेत...