आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २८ जानेवारीपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित व श्रीमहावीर प्रतिष्ठान आयोजित अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २८ ते ३१ जानेवारीदरम्यान सावेडी येथील माउली सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. प्राथमिक फेरी १ ते १० जानेवारीदरम्यान होणार आहे, अशी माहिती नरेंद्र फिरोदिया व स्वप्नील मुनोत यांनी गुरुवारी दिली.
ही स्पर्धा महाराष्ट्रातील हौशी नाट्यसंस्था आणि महाविद्यालयांसाठी खुली आहे. स्पर्धेचे उद््घाटन २८ जानेवारीला "दुनियादारी'फेम प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी अ. भा. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर असतील. अंतिम फेरी २८ जानेवारीला सकाळी ९ वाजता सुरू होईल. बक्षीस वितरण समारंभ ३१ जानेवारीला हिंदी चित्रपट अभिनेते शर्मन जोशी ("थ्री इडियटस्'फेम) यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेसाठी १ हजार रुपये प्रवेशशुल्क असून एकूण ३० एकांकिका अंतिम फेरीकरिता निवडल्या जाणार आहेत. प्रवेश अर्ज www.mahakarandak.com वर उपलब्ध असून प्रवेशिका २५ उिसेंसेंबरअखेर भरणे बंधनकारक आहे. एकांकिका सादर करण्यासाठी १ तासाचा कालावधी आहे.
सांघिक पारितोषिक प्रथम क्रमांक ६१ हजार १११ रुपये व अहमदनगर महाकरंडक, द्वि‍तीय ४१ हजार १११ रुपये, तृतीय २१ हजार १११, चतुर्थ ११ हजार १११ रुपये आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक ५ हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह, तर सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिकेसाठी ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस आहे. नगरच्या संघांसाठी विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
काही निवडक एकांकिकांना अंतिम फेरीसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अमोल खोले (९२७१७१२३९३), अभिजित दळवी (९०२८०८६८६२), पुष्कर तांबोळी (९२७००४६८४७) किंवाप्रसाद बेडेकर (९८९०९०३०००) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.