आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Minister Ram Shinde Said Punishment To Every Froud Person

सिंचन घोटाळ्यात दोषी आढळणाऱ्यांची गय करणार नाही...गृह राज्यमंत्री राम शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सिंचनघोटाळ्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. या चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,अशी माहिती गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी दिली.
शिंदे यांनी शुक्रवारी "दिव्य मराठी' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे शहर जिल्‍हाध्यक्ष अभय आगरकर, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, स्थायी समितीचे माजी सभापती बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक िनतीन शेलार आदी यावेळी उपस्थित होते.

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. या प्रकरणात जे दोषी आढळतील, त्यांची गय केली जाणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील दुष्काळग्रस्त गावांसाठी शासनाने साडेतीन हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून दुष्काळग्रस्त गावांमधील पाण्याबरोबरच अन्य नियोजन करण्यात येणार आहे. पाणी नियोजनासाठी सात हजार कोटींचा निधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यासाठी दिला आहे. टंचाईग्रस्त जिल्‍ह्यांतील गावांमध्ये पाणी विजेचा प्रश्न गंभीर आहे. तो सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. जलसंधारणाच्या कामातून मोठ्या प्रमाणात शेततळी तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
नगर शहरातील बाह्यवळण रस्ता, कुकडीचे पाणी, माळढोक पक्षी अभयारण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबर जिल्‍ह्यातील कोरडवाहू भाग सिंचनाखाली येण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे शिंदे यांनी सांगितले.
आर्थिक घोटाळे करणाऱ्या अनेक संस्थांच्या मालमत्ता पोलिसांनी जप्त केल्या आहेत. कायद्याच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. केबीसी घोटाळ्यातील संशयितांवर कडक कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ती रोखण्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

नगरमधील स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाचा प्रश्न समजावून घेऊन तो मार्गी लावला जाईल. याबाबत जानेवारीत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल, असे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक
-नागपूरयेथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेल्या लक्ष्यवेधी प्रश्नावर आदिवासी विकासमंत्र्यांनी धनगर आरक्षणाची सद्यस्थिती सांगितली. आरक्षणाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द दिला असून, तो प्रत्यक्षात पाळला जाईल. राज्य सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे.'' रामिशंदे, गृहराज्यमंत्री.