आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपशी अतूट नाते, त्यांच्या उमेदवारांचा प्रचारही करणार; खाेत यांचे राजू शेट्टींना उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘भाजप स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून अामची संघटना सांगेल तेव्हा सदाभाऊंनाही मंत्रिपद साेडावे लागेल,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख व खासदार राजू शेट्टी यांनी दिला हाेता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी शेट्टींना प्रत्त्युत्तर दिले अाहे.
 
‘भाजपशी आपले पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत आणि दोन्ही पक्षांतील युती अतूट असून ती सहजासहजी तुटणार नाही. भाजप अामच्या संघटनेत फूट पाडतेय असे मला तरी वाटत नाही,’ असे स्पष्टीकरण खाेत यांनी एका वृत्तवाहिनीशी बाेलताना दिले.  

‘निवडणुकीच्या काळात दाेन- चार कार्यकर्ते इकडेतिकडे होतात याचा अर्थ भाजप स्वाभिमानीत फूट पाडत आहे, असा होत नाही. केंद्र आणि राज्यातील सरकारला स्वाभिमानी संघटनेने पाच वर्षांसाठी पाठिंबा दिलेला आहे. सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. काही प्रश्न असतील सरकारच्या माध्यमातून समन्वयाने सोडवू,’ असे खाेत यांनी सांगितले.  

सध्या वेट अँड वॉचची भूमिका    
मुख्यमंत्री फडणवीसांशी जवळीक तसेच भाजपला आपलेसे करण्याच्या चर्चेवर खोत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे. निवडणुकीनंतरच याबाबत स्पष्टीकरण देईल,’ असे उत्तर त्यांनी दिले. 

घराणेशाहीच्या अाराेपाचे खंडन
घराणेशाहीबाबत खासदार राजू शेट्टींनी केलेल्या आरोपाचे खंडन करत खाेत म्हणाले की, ‘माझा मुलगा सागर हा माझ्या घरात जन्मायला आला हा त्याचा दोष आहे का? तो जर चळवळीशी एकनिष्ठ असेल. तर निवडणुकीत संधी न मिळणे हे त्याच्यासाठी अन्यायकारक ठरेल. त्याला रयत विकास आघाडीकडून त्याला जनतेने उमेदवारी दिली अाहे. आमदार शिवाजीराव नाईक, वैभव नाइकवाडे, नानासाहेब महाडिक तसेच राजू शेट्टी हेसुद्धा या आघाडीत आहे.  लोकांच्या मागणीनुसार त्याला उमेदवारी देण्यात आली. मला घाई असती तर मी त्याला पहिल्याच यादीत घेतले असते.’ 
 
राजू शेट्टी ‘तसे’ अाेघात बाेलले असतील   
ज्या ठिकाणी स्वाभिमानी संघटनेचे उमेदवार असतील त्या ठिकाणी मी प्रचार करेन; पण काही ठिकाणी आम्ही भाजपशी युती केली आहे तिथे त्यांचाही प्रचार करणार अाहे. शिराळा मतदारसंघात अामची भाजपशी युती आहे. आमच्या पहिल्या यादीतही भाजपच्या छोटमोठ्या गटांशी युतीची सांगड आहेच. जर राजू शेट्टींना भाजपशी आक्षेप असता तर ते माझ्याशी बोलले असते. आम्ही फार जुने मित्र आहोत. कोणतीही गोष्ट आम्ही सखोल अभ्यासानंतरच करतो. काल बोलण्याच्या ओघात ते कदाचित काही बोलले असतील असे मला वाटते. सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या घडामोडी किंवा वातावरण नाही. आम्ही प्रचार करतोय,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...