आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Minister Varsha Gaikwad Issue In Ahmednagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामाजिक कार्यकर्त्याचा मंत्र्याच्या गाडीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महिला व बाल विकास विभागातील कर्मचारी व अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने या विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वर येथील हरीओम बालगृहाचे चालक बाबूराव गिरी महाराज यांनी रविवारी दुपारी सहकार सभागृहासमोर अंगावर रॉकेल ओतून घेतले. मात्र, पेटवून घेण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. एसटी महामंडळातील वाहक पदावरुन निवृत्त झाल्यानंतर सर्वस्व पणाला लावून सन 2008 मध्ये त्यांनी हरीओम बालगृह सुरु केले. बालगृहाला मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी अधिकार्‍यांना साडेचार लाख रुपये दिले. वार्षिक अनुदान मिळवण्यासाठीही अधिकारी व कर्मचार्‍यांना टक्केवारीत लाच मागितली. 12 लाखांची लाच द्यावी लागल्याचे प्रतिज्ञापत्र गिरी यांनी यापूर्वीच दिले आहे. तक्रार केल्यानंतर संबंधितांची चौकशी करण्याऐवजी बालगृहाची मान्यताच रद्द करण्यात आली. शेवटी वैतागून गिरी यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. आणखी चार बालगृह चालकांनी महिला बालविकास विभागातील भ्रष्टाचाराची प्रतिज्ञापत्राद्वारे तक्रार केली आहे.

तक्रारींची चौकशी करू : गायकवाड
देशात सर्वाधिक बालगृह महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे नियंत्रणात अडचणी आहेत. या बालगृहांच्या मान्यतेचे निकष, पात्रता व तपासणीकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अलीकडेच तपासणीचे निकष बदलण्यात आले आहेत. नगर जिल्ह्यातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री वर्षा गायकवाड यांनी भाषणात दिले आहे.