आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी, आगरकर वाद आता प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात, प्रदेशाध्यक्षांनी दोन्ही गटाला दिला सबुरीचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर शहर भारतीय जनता पक्षातील अंतर्गत वाद आता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कोर्टात गेला आहे. दोन्ही गटांना त्यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, या वादाबाबत पालकमंत्री राम शिंदे हे दोन्ही गटांशी चर्चा करून मध्यस्थी करणार असल्याचे समजते.
लोकसभा िनवडणुकीपासून भाजपमध्ये खासदार िदलीप गांधी व शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्यात वाद सुरू झाले आहेत. विधानसभा िनवडणुकीत दोन्ही गटांतील वाद उफाळून आले. त्यानंतर झालेल्या नगर अर्बन बँकेच्या व िभंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या िनवडणुकीतही हे वाद कायम होते. अर्बनच्या िनवडणुकीत एकाच पक्षातील खासदार व शहर िजल्हाध्यक्ष यांनी स्वतंत्र चूल मांडून गटबाजीचे प्रदर्शन घडवले. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या िनवडणुकीत गांधी गट व आगरकर गटाने प्रचाराचे वेगवेगळे कार्यक्रम घेतले. यातून दोन्ही गटांतील दरी आणखी वाढत गेली.

याच जुन्या नाराजीतून िवधानसभा िनवडणुकीनंतर प्रथमच पक्षाच्या शहर कार्यालयात बोलवण्यात आलेल्या बैठकीत खासदार गांधी व शहर िजल्हाध्यक्ष आगरकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. या सर्व प्रकारामुळे दोन्ही गटांतील वाद िवकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले. २ फेब्रुवारीला आगरकर यांनी भाजपला शहरात अनुकूल वातावरण आहे. मात्र, काही पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याचे कारण पुढे करून शहर उपाध्यक्षपदावरून मनेष साठे, अनिल गट्टाणी, शहर जिल्हा चिटणीसपदावरून किशोर बोरा, प्रशांत मुथा व युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावरून सुवेंद्र गांधी यांना पदमुक्त केले. पदमुक्त करण्यात आलेले पदाधिकारी गांधी गटाचे आहेत. गांधी गटाने प्रदेशाध्यक्ष दानवे यांना पत्र लिहून न्याय देण्याची मागणी केली आहे. दानवे यांनी या वादाबाबत दोन्ही गटांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय वरिष्ठांनी ठेवला मागे-
अकरा महिन्यांपासून भाजपचे जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे. ग्रामीण भागात दांडगा संपर्क असणारा चेहरा मिळत नसल्याने हे पद रिक्त असल्याचे बोलले जाते. जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक असल्यामुळे वाद होण्याची शक्यता गृहीत धरून वरिष्ठांनी हा िनर्णय मागे ठेवला असल्याचे सांगण्यात येते.

पालकमंत्री करणार दोन्ही गटांशी चर्चा-
पालकमंत्री राम शिंदे हे शहर भाजपतील वादात मध्यस्थी करून दोन्ही गटांशी चर्चा करणार आहेत. त्यासाठी ते लवकरच बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीत दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. दोन्ही गटांत समेट घडवून आणण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेतेही प्रयत्नशील आहेत.