आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाशी राहू, पण मुलांना चांगले शिकवू; भिंगार बसस्थानकात झोपडपट्ट्यातील बालकांसाठी शिक्षण संसाधन केंद्र सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभ्यास केंद्राच्या उदघाटनप्रसंगी उपस्थित महिला मुली. - Divya Marathi
अभ्यास केंद्राच्या उदघाटनप्रसंगी उपस्थित महिला मुली.
नगर- शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत त्यांचे दैवतीकरण केले गेले. त्यांचे क्रांतिकारक विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा डोळस प्रयत्न झाल्याने गरिबी, अज्ञान आणि अंधश्रध्दामधून वंचित मागास समाजाची मुक्तता झाली नाही, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मुळे यांनी ऊर्जा बालभवनच्या अभ्यासिका, वाचनालय आणि संस्कार केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी व्यक्त केली. त्याला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्त्या मंगल पगारे यांनी प्रसंगी उपाशी राहू, कष्ट करू, पण मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याची प्रतिज्ञा सर्व पालकांना दिली. 

हगणदारी आणि दारुड्यांचा हक्काचा गुत्ता बनलेल्या भिंगार बसस्थानकात झोपडपट्ट्यातील बालके आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संसाधन केंद्र आणि अभ्यासिका सुरु करण्यात आली. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या त्याच्या लोकार्पणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन भिंगार छावणी मंडळाचे सदस्य रवी लालबोंद्रे, महेश नामदे, लोकेश मेहतानी, मुंबई येथील समाजसेवक जयवंत गडाख, स्नेहालयाचे अध्यक्ष संजय गुगळे, राजीव गुजर, अविनाश बुधवंत उपस्थित होते. 
 
भिंगार बसस्थानकाची दुरवस्था झाली होती. छताचे पत्रे फरशा फुटल्या होत्या, खिडक्या गायब झाल्या होत्या. दारूडे जुगारी तेथे येऊन बसत. पाठीमागे राहणाऱ्या सुमारे १०० गरीब आणि दलित मुस्लिम परिवारांसाठी ही डोकेदुखी बनली. घाण, जंतुसंसर्ग आणि अवैध धंद्यांचे हे केंद्र हटता हटत नव्हते. येथील वाईट गोष्टी बंद करण्यासाठी पोलीस आणि शासनाकडे जाण्यापेक्षा येथे अभ्यासिका, संस्कार केंद्र, वाचनालय सुरु करण्याचे ठरले. हे काम एकही पैसा खर्च करता केवळ श्रमदानातून आणि स्थानिक झोपडपट्टीतील लोकांच्या सहयोगातून यशस्वीरित्या करण्यात आले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...