आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शासकीय रुग्णालयांना निधी देेण्याच्या निर्णयास स्थगिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - राज्यातील शासकीय रुग्णालयांना सीटी स्कॅन एक्स-रे मशिनसाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे ४३ कोटी ६४ लाख रुपये देण्याच्या निर्णयास औरंगाबाद उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती याचिकाकर्ते विजयराव कोते यांनी दिली. कोते म्हणाले, निधी देण्याबाबत संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीने २४ जून २०१६ रोजीच्या सभेत मंजुरी दिली होती. मात्र या निर्णयास शिर्डी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. तसेच ग्रामस्थांच्या बैठकीत या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय झाला त्यासाठी सर्वांनी लोकवर्गणी गोळा केली होती.
मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले होते की, एका इंग्रजी वेबसाइटवरील बातमीनुसार २०१३- २०१५ या कालावधीत वैद्यकीय सेवा सुविधेसाठीच्या २०० कोटी रकमेपैकी केवळ १२६.४० कोटी म्हणजे ६३ टक्के रक्कम वापरण्यात आली. अंदाजपत्रकीय निधींची रक्कम, शासकीय/ निमशासकीय रुग्णालयांसाठीच्या यंत्र सामुग्रीच्या खरेदीसाठी वापरण्यात आल्यास इतर कोणत्याही आर्थिक मदतीची गरज भासणार नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे शिर्डीत आॅक्टोबर २०१७ पासून साईशताब्दी महोत्सव सुरू होत आहे. त्याच्या विकासकामांसाठी दीड हजार कोटी रुपयांची गरज आहे. ते शासनाने दिल्यास ही कामे संस्थानला करावी लागतील. यामुळे साईभक्तांसाठी निवास व्यवस्था, प्रसाद भोजन, दोन रुग्णालये, १०० रुग्णालयांना नियमित देण्यात येणारे वैद्यकीय अनुदान, शाळा आदींसह विविध समाजोपयोगी कार्यावर विपरित परिणाम होईल, असे याचिकेत म्हटले होते. युक्तिवादानंतर मुंबई उच्य न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निधी देण्यास स्थगिती दिल्याचे याचिकाकर्ते विजयराव कोते यांनी सांगितले.

आजवर रुग्णांना ८७ कोटींचे अनुदान
साईबाबासंस्थानने माहितीचा अधिकार कायद्यान्वये दिलेल्या माहितीनुसार, संस्थानच्या वतीने आजपर्यंत ८७ कोटी २० लाख ८७ हजार ७२ रुपये इतकी रक्कम साईनाथ रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय अनुदान लाभार्थी रुग्णांना दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...