आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगल गेट परिसरात किरकोळ दगडफेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - वाढदिवसाच्या कार्यक्रमाला स्पीकर लावण्यावरून मंगल गेट परिसरात रविवारी दुपारी किरकोळ दगडफेक झाली. पोलिसांनी तातडीने धाव घेतल्याने तणाव निवळला. याप्रकरणी तोफखाना ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

वाढदिवसानिमित्त मंगल गेट परिसरात शनिवारी (31 ऑगस्ट) लाउडस्पीकर लावण्यात आला होता. त्यावरुन किरकोळ वाद झाला. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास या वादाचे मोठय़ा भांडणात रूपांतर झाले. किरकोळ दगडफेकही झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक श्याम घुगे, तोफखाना ठाण्याचे निरीक्षक विजय पवार फौजफाट्यासह दाखल झाले. दोन्ही गटांना समजावून पोलिसांनी जमाव पांगवला. आमदार अनिल राठोड यांनीही घटनास्थळी भेट दिली. अण्णासाहेब नरसू वाडेकर (वय 70, जेजे गल्ली) यांनी पप्पू शिंदे, गट्टय़ा व इतर चार ते पाच लोकांविरुद्ध फिर्याद दिली आहे, तर उज्‍जवला विजय भुजबळ (35, घासगल्ली, कोठला) यांनी राकेश वाडेकर, शुभम भिंगारे व इतर सहा-सात व्यक्तींविरुद्ध फिर्याद दिली.