आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरुड क्रीडा संकुलातील गैरप्रकारांना लागणार चाप!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - येथील मध्यवर्ती भागात असलेल्या गरुड संकुलातील वादग्रस्त जागांवरील गैरप्रकार टाळले जावे, यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये कानाकोपतील तसेच डवळणाच्या वाटा बुजवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर अतिक्रमण कोपरे असलेल्या जागांवर सुशोभिकरण केले जाणार आहे. अपूर्ण बांधकामे पूर्ण केली जातील. यातून गरुड संकुलात होणा-या गैरप्रकारांना कायमचा आळा बसेल. गरुड संकुलाच्या सुशोभिकरणाचा विषय ‘दिव्य मराठी’ने यापूर्वी वारंवार मांडला होता. त्याची दखल आता घेण्यात आली आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गरुड मैदानावर व्यापारी संकुल उभारून त्याचा विकास करण्यात आला. मात्र, प्रशासकीय राजकीय इच्छाशक्ती अभावी या संकुलाचे बांधकाम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. त्याचबरोबर या संकुलात व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणही केले आहे. तसेच काही वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि क्रीडाधिकांना हाताशी धरत एकाने तर चक्क लिफ्टसाठी राखीव असलेल्या जागेत अतिक्रमण केले. त्या राखीव जागेवर गाळा उभारला. तसेच बाहेरील बाजूनेही हातगाडीधारकांनी दुकाने थाटलेली आहेत. वरील माळ्यावर असलेले रिकामे गाळे तसेच खालील बाजूस असलेल्या गाळ्यांचा प्रेमीयुगुलासह अवैध प्रकारासाठी वापर वाढला होता. या समस्यांवर ‘दिव्य मराठी’ने वारंवार प्रकाशझोत टाकला. त्यातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत व्यमान जिल्हाधिकारी ए. बी. मिसाळ आणि जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी गरुड संकुलाचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. गरुड संकुलाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आलेली आहे. त्यात गरुड मैदानातील व्यापारी संकुलातील गाळे हॉलची विविध रखडलेली कामे तसेच मैदानाची इतर कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे अडगळीत पडलेले गरुड संकुलाचे उशिराने का असेना रूप बदण्याची शाश्वती मिळालेली आहे. त्यामुळे आता तरी खेळाडूंना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे काम करण्यापूर्वी संकुलातील झालेले अतिक्रमण काढण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याने गरुड संकुल मोकळा श्वास घेणार आहे.

अशी आहे रक्कम
गरुड मैदानातील व्यापारी संकुलाच्या गाळे तसेच विविध हॉलच्या बांधकामासाठी ९९ लाख ४३ हजार ८११ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानासाठी ८६ लाख ५५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या कामासाठी निवा मागवण्यात आलेली आहेत. आगामी सहा महिन्यांत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे.

व्यापारी वर्गामध्ये समाधान
अनेक दिवसांपासून व्यापांनी संकुलाचे बांधकाम हे आराखड्याप्रमाणे व्हावे यासाठी मागणी लावून धरली होती. त्यामुळे आता आराखड्याप्रमाणे काम करण्यात येणार असल्याने व्यापांना समाधान लाभले आहे. दरम्यान ज्या व्यावसायिकांनी तसेच गाळेधारकांनी भाडे थकवले आहे. त्यांच्याकडे आता थकित रक्कम वसुलीसाठी तगादा लावण्यात येणार आहे.

या कामांचा आहे समावेश
गरुडसंकुलातील वरच्या माळ्यावरील अपूर्ण असलेले काम. त्यात प्लास्टर, स्टाइल बसवणे, रंगरंगोटी, पार्किंगची जागा, पाइपलाइन, शटर, खिडक्या, टाइल्स, शौचालयाची कामे, फ्लोअरिंग, प्रेक्षकगृह, मैदानाचे सपाटीकरण, मैदानाच्या बाजूला असलेल्या रिकाम्या गाळ्यातील कामे हाेणार आहेत. तळमजल्यात असलेली मोकळी जागा ही विशेषत: पार्किंगसाठी वापरली जाईल.
बातम्या आणखी आहेत...