आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stop Statue Burning, If Not Then Ready For Reaction Shelar

पुतळे दहनाचे प्रकार थांबवा, अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ - शेलार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय झाला, पण हा निर्णय एकट्या जलसंपदा मंत्र्यांचा नाही. मुख्यमंत्र्यांनाही याची कल्पना होती. जिल्ह्यातील एका जबाबदार मंत्र्याच्या कार्यकर्त्यांनी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या पुतळ्याचे दहन करणे, ही बाब दुर्दैवी आहे. हे प्रकार न थांबवल्यास आम्हीही आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी गुरूवारी काँग्रेसला दिला.

मराठवाड्याला पाणी देण्याच्या मुद्दय़ावरून नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष पेटला आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी तटकरे यांनी जायकवाडीला नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याविरोधात जिल्हाभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, अंबादास गारूडकर यावेळी उपस्थित होते.

शेलार म्हणाले, मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय झाल्यानंतर विखे कारखान्याच्या अध्यक्षांनी आंदोलन करून तटकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्यांच्या कृत्याचा मी निषेध करतो. पाणी देण्याचा विषय मोठा असल्याने त्याची मुख्यमंत्र्यांना कल्पना असते. त्यामुळे जबाबदार मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेणे दुर्दैवी आहे.