आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंताजी माणकेश्वर यांच्या स्मारकाबाबत उदासीनता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पृथ्वीराज चौहान यांच्यानंतर तब्बल २१ वर्षे दिल्ली ताब्यात ठेवून मराठी राज्यासाठी अनेक लढाया लढलेले अंताजी माणकेश्वर गंधे यांच्या कामगिरीची इतिहासात नोंद आहे. नगर जिल्ह्यातील कामरगाव येथे त्यांची किल्लावजा गढी अाहे. तेथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत त्यांच्या वंशजांकडून सरदार अंताजी माणकेश्वर गंधे स्मृती न्यासच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी त्यांनी सन २०१२ पासून राज्य सरकारकडे अनेकदा पत्रव्यवहार केला, पण तत्कालीन विद्यमान सरकारने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. उत्तर प्रदेश सरकार तेथील प्रशासन मात्र सातत्याने सकारात्मक प्रतिसाद देत आहे.
गंधे न्यासाने जानेवारी, फेब्रुवारी २०१५ मध्ये पालकमंत्री राम शिंदे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. गढीत विनापरवाना केलेले अतिक्रमण काढून टाकण्याबाबत न्यासाच्या वतीने सरपंच, ग्रामपंचायत तालुका पोलिसांकडे तक्रार पत्र देण्यात आले. तथापि, त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

ऐतिहासिक वास्तू कायद्यान्वये अतिक्रमण करणे, दगडी तटबंदीची नासधूस करणे, रंगवणे हा गुन्हा असूनही ग्रामपंचायत विद्यमान पदाधिकारी याबाबत हेतूपुरस्सर टाळाटाळ करत आहेत, असा आरोप न्यासाचे प्रमुख विश्वस्त ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ योगेश्वर गंधे यांनी मंगळवारी "दिव्य मराठी'शी बोलताना केला.

अतिक्रमणे त्वरित काढावीत...
कामरगाव येथील अंताजी माणकेश्वर यांच्या ऐतिहासिक गढीतील अतिक्रमणे ग्रामपंचायतीने त्वरित काढल्यास गंधे न्यास ते स्वत:हून काढून टाकेल. यात अतिक्रमणधारक ग्रामपंचायतीचे कोणतेही नुकसान झाल्यास गंधे न्यास जबाबदार राहणार नाही, असे योगेश्वर गंधे यांनी मंगळवारी सांगितले.

असे असेल प्रस्तावित स्मारक
कामरगावयेथील अंताजी माणकेश्वर यांच्या प्रस्तावित स्मारकात त्यांची जीवन चित्रावली, संग्रहालय, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा केंद्र, उद्यान पर्यटनस्थळाबरोबरच ३०० वर्षांपूर्वीच्या वाड्याचा समावेश असेल. त्यासंदर्भात नुकतीच गंधे कुलातील वास्तूतज्ज्ञांनी या गढीस भेट देऊन पाहणी केली. स्मारकाचा आराखडे तयार करण्याचे काम सुरु आहे. जगभरात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या गंधे कुलातील प्रत्येक व्यक्ती या स्मारकासाठी विविध प्रकारचे काम करत आहे.

गांधींच्या पत्राची दखल नाही
खासदार दिलीप गांधी यांनी गंधे न्यासाने दिलेल्या पत्राची त्वरित दखल घेऊन मागील वर्षी ११ जुलैला वार्षिक योजना २०१५-१६च्या नावीन्यपूर्ण योजनेतील राखीव निधीतून कामरगाव गढी-स्मारक जीर्णोध्दारासाठी निधी वितरीत करण्यासाठी व्हीआयपी/१०७४/१५ चे पत्र दिले. परंतु प्रशासनाने अद्याप कार्यवाही केलेली नाही.

योगदान स्फूर्तिदायक
जिसकेबलबुतेपर मराठोंका परचम हिंदुस्थान में आबाद रहा और बंगश तथा अब्दाली जैसे बाहरी शत्रूसे देश बचके रहा. वह मुत्सद्दी योध्दा अंताजी माणकेश्वरजी का योगदान केवल सराहनीय ही नही, बल्की स्फूर्तिदायक भी है. लेकीन हमारी राजनितीने इस महान योध्दा को अभितक उपेक्षित रखा है...'' पंकज गुप्ता, इतिहासअभ्यासक.