आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुझा जीव वाचवला अन् तुझ्यात जीव रंगला, वाचा कॉलेच युवतीची आणि 'ति'ची अनोखी कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ‘जगा आणि जगू द्या’ प्राण्यांना पशु-पक्षांवर प्रेम करा, असा संदेश शालेय शिक्षणात मिळतो. या संदेशाचे प्रत्यक्षात अनुकरण मात्र एका विद्यार्थीनीने केले. नगर-औरंगाबाद रोडवरील वीर सावरकर मार्ग येथे ठाकूर कुटुंब वास्तवास आहे. डिम्पल ठाकूर या कॉलेज युवतीने एक महिन्यापूर्वी एक दिवसाच्या चिमणीच्या पिल्लाचा जीव वाचवून तिला चक्क घरी आणले. त्या पिल्लाला एक महिन्यापर्यंत त्या चिमणीच्या पिल्लाला जीव लावला. 

 

तिचे ‘कप-की’ नाव ठेवून त्या नावाने हाक मारली कि ती पण लगेच माणसांच्या अंगा-खांद्यावर येऊन बसते. जीव लावला कि रानच पाखरु जवळ येत असं आबालवृद्ध मंडळी म्हणत असत. त्याचा प्रत्यय या ठाकूर कुटूंबात आला. ‘कप-की ये’ म्हणताच. उडत उडत खांद्यावर येऊन बसली. डिम्पलने पुन्हा ‘कप-की ये’ म्हटले कि तिच्याकडे उडून जायची अशी ही चिमणी ठाकूर कुटुंबात सध्या वावरते. बाहेर कुठेही ती जात नाही. हे कुटूंब आठ दिवसांपूर्वी हैद्राबादला फिरायला गेले तर ही चिमणी देखील गाडीमध्ये त्यांच्याबरोबर गेली. डिम्पल अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. चिमणी बरोबर मी रमले तिचा मला लळा लागला, अशी प्रतिक्रिया डिम्पलने दिली. 

बातम्या आणखी आहेत...