आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कष्ट, जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर सीताबाई झाल्या एसटी कंडक्टर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीताबाई खेडकर आपले कर्तव्य बजावत असताना... - Divya Marathi
सीताबाई खेडकर आपले कर्तव्य बजावत असताना...
प्रतिनिधी- त्यासहा बहिणी. त्यातली सीताबाई चौथ्या क्रमाकांची लेक. लहानपणापासून शिक्षणाची ओढ जिद्द या जोरावर त्या एसटी महामंडळात वाहक (कंडक्टर) पदावर नोकरी करू लागल्या. संसाराच्या गाड्याला कष्टाची झालर चढवून डगमगता त्या सक्षमपणे नोकरी करत आहेत. तान्हुल्याला घरी ठेवून कर्तव्य बजावणाऱ्या या सावित्रीच्या लेकीचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. 

शिक्षणाचा पाया भक्कम करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या लेकींनी आता सर्वच क्षेत्रांत भरारी घेतली आहे. एसटी महामंडळात वाहक पदावर अनेक महिला सक्षमपणे काम करताना पाहून समाजसुधारकांचे कष्ट सार्थकी लागले याची प्रचिती येते. 

कर्जत तालुक्यातील रवळगावच्या मारुती खेडकरांना सहा लेकी. त्यातील सीताबाई यांनी लहानपणापासूनच काहीतरी करून दाखवण्याची जिद्द उराशी बाळगून शिक्षण केले. कोल्हापूरला डीएड पूर्ण करून सीईटीची परीक्षा दिली. स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. २०१२ मध्ये तिचे लग्न होऊन ती मिसाळांची सून झाली. 

लग्नानंतर पती नितीन यांनी दिलेली साथ कुटुंबाकडून मिळणारे प्रोत्साहन या जोरावर सीताबाईंना २०१३ मध्ये एसटी महामंडळात वाहक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. गरोदर असतानाही सात महिन्यांपर्यंत त्या काम करत होत्या. प्रसुती रजा संपली, त्यावेळी तान्हुले पाच महिन्यांचे असताना त्या पुन्हा कामावर रुजू झाल्या. श्रीगोंद्यात त्यांची धाकटी बहीण तान्हुल्याला सांभाळायची. श्रीगोंद्यातच नोकरी असायची, पण कामाची वेळ निश्चित नव्हती. जेवणाच्या सुटीत तान्हुल्याकडे जाऊन पुन्हा पुढच्या फेरीसाठी बसमध्ये परतायचे. 

वाहक म्हणून सेवा करताना अनेक कटू-गोड अनुभव सीताबाईंना आले. बऱ्याचदा सुट्या पैशांवरून प्रवाशांशी शाब्दिक चकमक व्हायची, पण सीताबाई कधी डगमगल्या नाहीत. आजही त्या घरची जबाबदारी सांभाळून यशस्वीपणे नोकरी करत आहेत. त्यांच्या जिद्दीला बहिणाबाईची कविता समर्पक वाटते. “अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं, झोका झाडाले टांगला, पिलं निजले खोप्यात, जसा झुलता बंगला, खोपा इनला इनला, जसा गिलक्याचा कोसा” चूल आणि मूल या संकल्पनेला मागे टाकून महिलांनी सर्वच क्षेत्रांत आघाडी घेतली. त्यांच्या जिद्दीला आता सारेच सलाम करू लागले आहेत. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...