आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणप्रणालीमध्ये हवे धोरणात्मक बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - समाज, शैक्षणिक संस्था उद्योग विश्व यांनी समन्वय साधून काम केले, तर देशाचा विकास होण्यास मोठा हातभार लागणार आहे. यासाठी सर्वांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून काम करायला हवे. उद्योजक शिक्षण संस्था यांच्यातील दरी वाढल्याने देशात समस्या वाढल्या आहेत. ही दरी दूर करण्याची आवश्यकता असून शिक्षणप्रणालीत धोरणात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी केले.
आयएमएस संस्थेत स्थापन करण्यात आलेल्या कौशल्यवृद्धी उद्योजकता विकास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ खेडकर, बीपीएचई सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत बोर्डे, संस्थेचे सरसंचालक डॉ. शरद कोलते, फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्टचे रमेश फिरोदिया, सविता फिरोदिया, कांतीलाल जैन, सतीश शर्मा, डॉ. एम. बी. मेहता, जिल्ह्यातील १४ शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. गाडे म्हणाले, विकसित देशात शिक्षण संस्था, उद्योग विश्व समाज एकत्र मिळून काम करताना दिसतात. आपल्याकडेही या घटकांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे.
सरकारी नोक-यां ऐवजी उद्योजकतेकडे वळण्याची मानसिकता समाजासोबतच युवकांनी ठेवावी. सरकारी नोकऱ्या उरल्याच नसल्याने यशस्वी उद्योजकांचा आदर्श समाज युवकांपुढे ठेवल्यास चित्र पालटता येईल.

गाडे म्हणाले, विद्यार्थ्यी पारंपरिक विचारांच्या बाहेर पडत कल्पना करायला लागले, तरच ते वैज्ञानिक होतील. घोकंमपट्टीचा आधार असणारा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी घातक आहे. विद्यार्थ्यांना विचार करण्यास भाग पाडणारा अभ्यासक्रम हवा. गाईड वगैरेला काहीही अर्थ नाही. कल्पनाशक्ती निर्माण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवण्यास दिले पाहिजेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना सामाजिक समस्यांची जाण अधिक आहे. याचा आपण वापर करून घेतला पाहिजे.

मुलांचा कल कशात आहे, हे जाणून घेतल्यास देशातील समस्या सोडवण्यास मदत होणार आहे. जगात भारताइतका हुशार तरुण वर्ग इतर कोणत्याही देशाकडे नाही, तरीही आपले प्रश्न सोडवण्यासाठी इतर देशांवर अवलंबून रहावे लागते, हे दुर्दैवी असल्याचे गाडे म्हणाले.
पाहुण्यांचे स्वागत डॉ. एम. बी. मेहता यांनी केले. प्रा. ऋचा तांदुळवाडकर यांनी परिचय करून दिला. प्रास्ताविक डॉ. शरद कोलते यांनी, तर आभार प्रा. उदय नगरकर यांनी मानले.

मानसिकतेत बदल हवा
दरवर्षीआपल्या देशातील १५ हजार हुशार मुले परदेशात जातात. याचे आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. या हुशार विद्यार्थ्यांची गुणवत्ता वापरण्याची क्षमता आपण विकसित करू शकलेलो नाही. ती विकसित करण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत. मुलांनी उद्योजक होता नोकरी केली पाहिजे, ही पालकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन बीपीएचई सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत बोर्डे यांनी केले.

सव्वा कोटींचा निधी
रमेशफिरोदिया ट्रस्टकडून उद्योजकता विकास केंद्रासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. आयएमएस संस्थेकडून कोणतीही मागणी झालेली नसतानाही चांगल्या उपक्रमासाठी ट्रस्टने स्वत:हून पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे केला. त्याची परतफेड करत संस्थेनेही आयएमएससोबत फिरोदिया ट्रस्टचे नाव उद्योजकता विकास केंद्राला दिले आहे.

अद्ययावत विभाग
सावित्रीबाईफुले पुणे विद्यापीठ वेगवेगळ्या प्रकारचा विचार करून काम करत आहे. त्यात उद्योगविश्वसोबत काम करण्यासाठी विद्यापीठ मानसिकदृष्ट्या तयार झाले आहे. विद्यापीठाने देशातील अव्वल ७६ कंपन्यांना सोबत घेत तंत्रज्ञान विभाग सुरू केला आहे. असा उपक्रम राबवणारे पुणे विद्यापीठ हे देशातील एकमेव ठरलेे, असे कुलगुरु डॉ. गाडे यांनी सांगितले.
भास्कर पांडुरंग हिवाळे सोसायटीच्या आयएमएस-रमेश फिरोदिया एज्युकेशनल ट्रस्टचे स्कील एनांससमेंट इंटरप्रिनीअरशीप डेव्हलमेंट सेंटरचे उदघाटन करताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु वासुदेव गाडे. छाया: कल्पक हतवळणे

निधीनुसार काम
सावित्रीबाईफुले पुणे विद्यापीठाचे नगर नाशिक येथील उपकेंद्र चांगल्या पद्धतीने उभारण्याचे काम सुरू अाहे. तंत्रशुद्ध पद्धतीने सुविधा विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. खर्च अधिक असल्याने शासनाकडून टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येत आहे. शासन बदलल्याचा कोणताही परिणाम निधी उपकेंद्राच्या कामावर झालेला नाही.'' डॉ.वासुदेव गाडे, कुलगुरु,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
बातम्या आणखी आहेत...