आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुलेलाल मंदिरासमोर दगडफेकीमुळे तणाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या प्रभाग ११ पोटनिवडणुकीत शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास पुन्हा राडा झाला. दोन दिवसांपूर्वी शिवसेना राष्ट्रवादीत तू-तू, मै-मै झाली होती. शनिवारी रात्री तारकपूर परिसरात झुलेलाल मंदिरासमोर दगडफेेक झाल्याने तणाव निर्माण झाला.
मनपाच्या दोन जागांसाठी होणारी पोटनिवडणूक शिवसेना राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. स्वत: आमदार संग्राम जगताप रात्री एक-दीडपर्यंत प्रभागात फिरत होते. दोन दिवसांपूर्वी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल हडकोतील रस्त्याचे काम बंद पाडले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी झुलेलाल मंदिरासमोर लावलेला योगिराज गाडे यांचा प्रचारफलक काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरून तणावाचे वातावरण होते. शनिवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला.
झुलेलाल मंदिरासमोर दगडफेक झाली. या घटनेची माहिती मिळताच अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते घटनास्थळी जमले. महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह काही नगरसेवकही आले. सेनेचे पदाधिकारीही तयारीत होते. पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तेथे पोहोचले. अर्ध्या-पाऊण तासानंतर स्थिती पूर्वपदावर आली.