आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीजेला परवानगी नाही, ध्वनिप्रदूषण कायद्यासंदर्भात पोलिस कठोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ.सौरभ त्रिपाठी, जिल्हा पोलिस अधीक्षक - Divya Marathi
डॉ.सौरभ त्रिपाठी, जिल्हा पोलिस अधीक्षक
नगर - ध्वनिप्रदूषणासंबंधीहायकोर्टाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत डीजेला परवानगी दिली जाणार नाही. आवाजाच्या मर्यादेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा खणखणीत इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांना दिला आहे. केवळ सार्वजनिक सण उत्सवातच नाही, तर इतर वेळीही खासगी कार्यक्रमांना हाच नियम लागू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ध्वनिप्रदूषण न‍ियंत्रण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने तयारी केली आहे. त्याविषयी डॉ. त्रिपाठी म्हणाले, ध्वनिप्रदूषणासंबंधींच्या तक्रारी आता थेट पोलिसांकडेही करता येतील. त्यासाठी पोलिस नियंत्रण कक्षाचा १०० हा क्रमांक आहे. याशिवाय सर्व पोलिस ठाण्यांत नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील २९ पोलिस ठाण्यांसह जिल्हा नियंत्रण कक्षातही फोनद्वारे ईमेलद्वारे तक्रार करता येईल.जिल्हा नियंत्रण कक्षात ०२४१-२४१६१३२ किंवा ९८२२९०८६७५ या क्रमांकावर तक्रारी करता येतील. खासगी कार्यक्रमांतही डीजे लावण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. महापालिकेतर्फे झोन निश्चित करण्यात येत असून त्यानुसारच आवाजाची पातळी ठेवावी लागणार आहे. या नियमाचा भंग करणाऱ्यांवर या कायद्यातील तरतुदींनुसार साधनसामु्ग्री जप्ती दंडाची कारवाई केली जाईल. वाढदिवस, लग्नाची वरात आणि इतर कार्यक्रमांतही डीजे लावले जातात. हल्ली तर कोणताच सण, उत्सव डीजेच्या तालावर थिरकल्याशिवाय साजरा होत नाही. यापुढे मात्र डीजे "म्युट' राहणार आहे. त्याकरिता आतापासूनच कडक भूमिका घेण्यात येत आहे.
एसपींशी थेट संपर्क
जिल्ह्यातीलकायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिसांना जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे कोणी कायद्याचे उल्लंघन करत असेल, अवैध धंदे सुरू असतील किंवा पोलिसांबद्दल काही तक्रारी असतील, तर थेट पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून माहिती देता येईल. त्याकिरता पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी ८६ ०५ ९११ २१३ हा मोबाइल क्रमांक जाहीर केला आहे.
कायदा बंधनकारक
डीजेमालकचालकांनाही सूचना देण्यात येत अाहेत. उत्सवात विघ्न आणण्याचा आमचा उद्देश नाही. उत्सव आनंदातच साजरे झाले पाहिजेत. पण कायद्याच्या चौकटीत राहूनच ते साजरा व्हायला हवेत, अशा सूचना आतापासूनच देण्यात येत आहेत.'' डॉ.सौरभ त्रिपाठी, जिल्हा पोलिस अधीक्षक