आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगरात नेहरू मार्केटसाठी बेमुदत उपोषण सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- चितळे रस्त्यावरील नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेत भाजी मंडईसाठी बहुउद्देशीय व्यापारी संकुल बांधण्याचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी नेहरू मार्केट कृती समिती आणि हातगाडी व भाजी विक्रेते संघटनेने शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणात विविध राजकीय पक्षांसह भाजीविक्रे ते सहभागी झाले आहेत.

कृती समितीचे अध्यक्ष वसंत लोढा व भाजी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे यांच्या नेतृत्त्वाखाली नेहरू मार्केटच्या मोकळ्या जागेत उपोषण सुरू करण्यात आले. माजी महापौर संग्राम जगताप, उपमहापौर गीतांजली काळे, नगरसेवक किशोर डागवाले, शिवाजी लोंढे, ब्रिजलाल सारडा, शंकरराव घुले, सतीश मैड, अशोक बाबर, मधुसूदन मुळे, दीपक सूळ, उबेद शेख यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चक्री उपोषण करून आंदोलनास पाठिंबा दिला. चितळे रस्त्यावरील सर्व भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवून आंदोलनात भाग घेतला.

पाडापाडीचे राजकारण आता खूप झाले. शहर विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे शंकराव घुले यांनी या वेळी सांगितले