आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजच्या विद्यार्थ्याचा खड्ड्याने घेतला बळी, जामखेड रस्त्यावर खड्डा चुकवण्याच्या नादात धडक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द्य नगर - जामखेडरस्त्यावर असलेला खड्डा चुकवण्याच्या नादात गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाला. ऋषीकेश उगले रघुनाथ उगले (वय २०, रा. जेऊर हैबती, ता. नेवासे) असे दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडला. डोक्याला मार लागल्यामुळे ऋषीकेश जागीच गतप्राण झाला. त्याने हेल्मेटही परिधान केलेले नव्हते. 
 
ऋषीकेश विश्वभारती अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. त्याने नुकतेच नव्याने या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. तो मेकॅनिकल विभागच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. सकाळी कॉलेजात जाण्यासाठी तो दुचाकीवरुन निघाला होता. मात्र खड्डा चुकवण्याच्या नादात एका टेम्पोने धडक दिल्याने तो जबर मार लागून जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती समजताच महाविद्यालयाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. 
 
ऋषीकेशला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. माऋ उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळेच ऋषीकेशचा बळी गेला, अशी चर्चा गर्दीतील नागरिकांमध्ये होती. ऋषीकेश मूळचा नेवासे तालुक्यातील असून काही दिवसांपूर्वीच तो नगरला रहायला आला होता. त्याच्या अपघाती निधनामुळे महाविद्यालयातही शोककळा पसरली. या रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी, तसेच अजवड वाहतुकीला आळा घालण्यासाठी कॉलेजचे विद्यार्थी प्रशासनाला निवेदन देणार आहेत. दोन दिवसांत शहरातील अपघातामध्ये दोन बळी गेले आहेत. 
 
महिला पोलिसही ठार 
गुरूवारीदुपारी बंदोबस्तावरुन परतत असलेल्या महिला पोलिस भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेमुळे जागीच ठार झाल्या. मीराबाई ठकाराम दांगडे (वय २५) असे दुर्दैवी महिला पोलिसाचे नाव आहे. या अपघातात मीराबाई यांचे पती योगेश शंकर भापकर हे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांचा तीन वर्षांचा मुलगा उत्कर्ष मात्र बालंबाल बचावला. दांगडे या कोतवाली पोलिस ठाण्यात नेमणुकीला होत्या. या अपघातामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...