आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कॉंग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी शुक्रवारी दुपारी गांधी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेमुळे या परिसरातील पाच शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारी अघोषित सुटी द्यावी लागली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थी व मुख्याध्यापकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गांधी मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेची वेळ दुपारी दोनची होती. तथापि, दुपारी बारापासूनच वातावरणनिर्मितीसाठी ध्वनिक्षेपकांवरून गाणी व आवाहन सुरू होते. गांधी मैदानाला लागूनच पाच शाळा आहेत. मार्कंडेय विद्यालय, प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळा, इचरजबाई फिरोदिया शाळा, नूतन प्राथमिक विद्यालय, पोटेन्ना बत्तीन प्राथमिक विद्यालय या शाळांमधील विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला. सभास्थळी वाजणार्‍या मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांमुळेही विद्यार्थी अस्वस्थ होत होते. शेवटी शिकवणे अवघड झाल्याने शाळांना सुटी देण्यात आली. हा परिसर ‘सायलेंस झोन’असतानाही जाहीर सभेसाठी लावण्यात आलेले ध्वनिक्षेपक व फटाके सायलेंस झोन धाब्यावर बसवणारे ठरले.