आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Suicide Case In Sangamner Polytechnic College

‘मानसिक छळातूनच विद्यार्थ्याची आत्महत्या’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - संगमनेर येथील अमृतवाहिनी पॉलिटेक्निकमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या प्रदीप खंडागळे या विद्यार्थ्याने मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणाची चौकशी करावी, या मागणीसाठी प्रदीपच्या कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने केली.

यासंदर्भात प्रदीपचे वडील भाऊसाहेब खंडागळे यांनी पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, प्रदीप संगमनेर येथील अमृतवाहिनी पॉलिटेक्निकमध्ये गेल्यापासून त्याचा इतर मुलांकडून छळ सुरू होता. या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. मानसिक व शारीरिक त्रासातून त्याने आत्महत्या केल्याचे संगमनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, मानसिक छळाचे कलम लावलेले नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी; अन्यथा 22 जानेवारीला नगर- औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल येथे वांजोळी, खोसपुरी, झापवाडी, लोहगाव, घोडेगाव या भागातील ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.