आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरात गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भाळवणी येथील विजयगंगा नर्सिंग कॉलेजची विद्यार्थिनी रिजवाना इसाक शेख (18, पिंप्रीजलसेन, ता. पारनेर) हिने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी (11 जून) सायंकाळी उघडकीस आले. दरम्यान, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप रिजवानाच्या नातेवाईकांनी केल्यामुळे मृतदेहाची तपासणी पुण्याच्या ससून रुग्णालयात करण्यात आली. बुधवारी दुपारी तिच्या पार्थिवावर पिंप्रीजलसेन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भाळवणी येथे भाड्याने घेतलेल्या खोलीत रिजवाना वर्गमैत्रिणींसह राहत होती. आजारपणाचे कारण सांगून मंगळवारी ती कॉलेजला गेली नव्हती. सायंकाळी मैत्रिणी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.