आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students Certificates,Latest News In Divya Marathi

विद्यार्थांना दाखले तातडीने द्या; छावा संघटनेचा ठिय्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयातून विद्यार्थांना विविध प्रकारचे दाखले तातडीने द्यावेत, या मागणीसाठी गुरुवारी छावा संघटनेतर्फे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सांगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. योगेश बनकर, ज्ञानेश्वर बेल्हेकर, योगेश टापरे, सुशांत लगड, सुदेश वरपे, अक्षय कांबळे, सुयोग दारकुंडे, किरण आडेप आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
या संदर्भात सांगळे यांनी तहसीलदार चंद्रकांत नागवडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शाळा व महाविद्यालयांतील प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयात येतात. मात्र, सेतू कार्यालयात आल्यानंतर महा-आॅनलाइनचे सॉफ्टवेअर बंद असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पालकांचे व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. सेतू कार्यालयाने विद्यार्थांना तातडीने दाखले मिळवून द्यावेत, अशी मागणी सांगळे यांनी केली आहे.