आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students Give Contribution Through Research Prithviraj Chavan

विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्तीतून योगदान द्यावे - पृथ्वीराज चव्हाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - येथील अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने सातत्यपूर्ण गुणवत्तेने मोठा लौकीक मिळवला असून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्तीमधून भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अमृतवाहिनी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अमृत कला मंच येथे आयोजित पदवीग्रहण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, सत्यजित तांबे, शरयू देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जे. विखे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय चौधरी, प्रा. व्ही. बी. धुमाळ, अशोककुमार मिश्रा, परीक्षा विभागप्रमुख वैभव हासे प्रा. सय्यद आदी उपस्थित होते. यावेळी अभियांत्रिकीच्या ४५ फार्मसीच्या ३० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाऊसाहेब थोरात यांनी दूरदृष्टीतून सुरू केलेल्या या महाविद्यालयाने मागील ३० वर्षांत सततच्या गुणवत्तेमुळे देशात मोठा लौकीक निर्माण केला. भारतामध्ये नैसर्गिक साधनसामुग्री जरी कमी असली, तरी बुद्धिमत्ता अफाट आहे. त्याचा वापर संशोधनासाठीच व्हावा. केंद्र राज्य सरकारने ही विद्यापीठामधील संशोधनासाठी जास्त निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी संधी आहे. बुद्धिमत्तेचा वापर देशाचा विकासासाठी करावा, असे आवाहन ही त्यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी. जे. विखे यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. धनवंती काळोखे मयुरी गाडे यांनी केले. प्राचार्य डॉ. संजय चौधरी यांनी आभार मानले.
संशोधनातून नवनिर्मिती करावी
पदवी ग्रहण समारंभ हा विद्यार्थ्यांचा जीवनातील मोठा क्षण आहे. विद्यार्थ्यांनी यापुढे जगाच्या बाजारपेठेत आत्मविश्‍वास गुणवत्तेने काम करा. ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची चळवळ स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, भाऊसाहेब थोरात यांनी दूरदृष्टीने सुरू केली. या शिक्षणामुळे ग्रामीण भागात घरोघरी उच्च शिक्षित अभियंते झाले. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांना पायाभूत उद्योग सुरू करण्यास प्राधान्य दिले होते. विद्यार्थ्यांनी संशोधनातून नवनिर्मिती करून संस्थेचा लौकिक वाढवा. बाळासाहेब थोरात, आमदार.