आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subhashchandra Bose Sainik Vidyalay Fulgoan News In Marathi

कलाजगत: विकास कांबळेने साकारले विवेकानंदांचे शिल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पुण्यातील आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानतर्फे (घारेवाडी) फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात नगरच्या तरुण शिल्पकार विकास प्रकाश कांबळे याने स्वामी विवेकानंदांचे शिल्प तयार केले. त्याच्या या प्रात्यक्षिकास मोठा प्रतिसाद मिळाला.

बलशाली युवा हृदय संमेलनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंद्रजीत देशमुख यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानादरम्यान शिल्पकार विकासने स्वामी विवेकानंद यांच्या शिल्पाचे प्रात्यक्षिक करून त्यांच्या जीवनचरित्रावर नेमका प्रकाश टाकला. प्रत्येकात एक विवेकानंद दडलेला असतो, याची प्रचिती या प्रात्यक्षिकातून प्रत्येकाने अनुभवली. विकासच्या कलेचे मान्यवरांनी कौतुक केले.