आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुईकोट किल्ला विकासाचा आराखडा तत्काळ सादर करा, पर्यटनमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी रविवारी भुईकोट किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली. - Divya Marathi
राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी रविवारी भुईकोट किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली.
नगर- ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या सुशोभिकरण विकासाचा आराखडात पंधरा दिवसांत सादर करा, सरंक्षण, राज्याचा पर्यटन विभाग जिल्हा प्रशासनाने संयुक्तपणे हा आराखडा सादर करावा, असे आदेश पर्यटन रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांना रविवारी दिले. साईशताब्दी आराखड्यात नगरच्या पर्यटन विकासाला स्थान देण्याचे संकेतही रावल यांनी दिले. 

ऐतिहासिक भुईकोट िकल्ल्याला मंत्री रावल यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार दिलीप गांधी, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, उपमहापौर श्रीपाद छिंदम, इतिहास अभ्यासक भूषण देशमुख, नगरसेवक सुवेंद्र गांधी आदी उपस्थित होते. रावल म्हणाले, जगात पर्यटन हा मुख्य व्यवसाय झाला आहे. ज्या देशात पर्यटनाला चालना मिळते, तोच देश विकसित झाला आहे. महाराष्ट्रतही मोठे पर्यटन स्थळे आहेत. बर्फ सोडला तर सर्व काही राज्यात आहे. नगरच्या एतेहासिक पवित्र भूमीत हा एतेहासिक भूईकोट किल्ला असून त्याच्या विकासाठी आतापर्यंत प्रयत्न झाले. आता हा किल्ला पर्यटन स्थळ व्हावे, यासाठी काम करणार आहे. किल्ल्याच्या विकाससाठी एकदम मोठा निधी देऊ शकलो नाही, तरी थोड्या थोड्या स्वरूपात निधी देऊ. तसा प्रस्ताव पाठवा, शिर्डी हे अंतरराष्ट्रीय स्थळ झाले आहे. त्याच्या अनुषंगाने नगरचा विकास होणे गरजेचे आहे. शिर्डी नंतर काय, तर नगरचा भुईकोट किल्ला, शिर्डी - शिंगणापुरला येणारा प्रत्येक पर्यटक येथे थांबेल, असा विकास करण्यासाठी संरक्षण, पर्यटन जिल्हा प्रशासन एकत्र येऊन काम करू, असे आवाहन रावल यांनी केले. 

भर पावसात किल्ल्याची पाहणी 
रावल यांनी रविवारी पावसात भुईकोट किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खोल्यांसह किल्ल्यातील विविध भागांची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. रावल यांनी खासदार गांधी यांच्या निवासस्थानी भेट दिली. गांधी यांनी त्यांचा सत्कार करून नगरच्या एेतिहासिक किल्ल्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निवेदन स्मरण पत्र रावल यांना दिले. 
बातम्या आणखी आहेत...