आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुदाम निकमला आणखी चौघांना ठार करायचे होते, कमरेला गोळ्यांचा पट्टा बांधून बडबडत होता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सुदाम निकम
श्रीगोंदे - पत्नीचा खून करून आत्महत्या करणाऱ्या तालुक्यातील आढळगाव येथील सुदाम निकम या माथेफिरू जवानाला चौघांना टिपायचे होते, मात्र 'सावज' टप्प्यातून पसार झाल्याने त्याचा डाव फसल्याची धक्कादायक माहिती ग्रामस्थांकडून 'दिव्य मराठी' ला समजली.
लष्करात बंगळुरू येथे प्रतिनियुक्तीवर असणारा सुदाम निकम हा सुटीत गावी आला होता. पत्नीसह फिरायला जायचा त्याचा बेत होता. मात्र, पत्नीने फिरायला जाण्यास उत्सुकता दाखवली नसल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांकडून समजली. फिरायला गेल्यावर तिचे बरेवाईट करण्याचाही त्याचा बेत पत्नीच्या लक्षात आला असावा. निकम कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांकडून समजलेल्या माहितीनुसार पत्नीची गोळी झाडून हत्या केल्यानंतर सुदाम याने चाळीस गोळ्या असलेला पट्टा कमरेला बांधला. खांद्यावर बंदूक अडकवली. दुचाकीवर तो बसस्थानकाजवळ आला. त्याची नजर 'सावजाचा' शोध घेत होती. आज चार जणांचा मुडदा पाडणार, असे तो बडबडत असल्याचे अनेकांनी ऐकले. ज्यांना ठार मारण्याचा बेत होता. सावज टप्प्याच्या बाहेर गेल्याने निराश झालेला हा जवान पुन्हा आढळगाव आरोग्य केंद्रात आला. नंतर मोबाइलवरून कॉल केला. मी आत्महत्या करीत आहे, असे त्याने सांगितल्याचे तेथे काहींनी ऐकले. कॉल पूर्ण झाल्यावर त्याने पहिली गोळी हवेत झाडली. दुसरी गोळी झाडली ती हनुवटीवर लागून आरपार गेली. त्याला आणखी चौघांना टिपायचे होते, ते चौघे कोण, त्या मागील कारणे काय? याचा पोलिसांनी कसून शोध घेण्याची गरज आहे.

जवानाच्या मुलाकडे पोलिसांची चौकशी
पत्नीसठार करणाऱ्या जवानाला आठ वर्षीय मुलगा आहे. घटनेच्या वेळी तो घराबाहेर होता. खुनामागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जवानाच्या मुलाकडे काल आज चौकशी केली. त्याच्याकडून काही माहिती मिळते का याची चाचपणी श्रीगोंदे पोलीसांनी केली. आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू अन् चौकशी कामी पोलिसांचा फेरा यात या बालकाची ससेहोलपट सुरू आहे.

अंत्यसंस्कार करण्यासाठी जीवघेणी प्रतीक्षा
आढळगावहत्याकांडातील दोघा मृतदेहांचे शवविच्छेदन अन् अंत्यसंस्कारासाठी बुधवारी रात्रीपर्यंत तब्बल तीस तास जीवघेणी प्रतीक्षा करावी लागली. श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयाने शवविच्छेदनास नकार देत मृतदेह पुण्याला ससूनला रवाना केले. ससूनच्या डॉक्टरांनी पोलिसांच्या पंचनाम्यावर आक्षेप घेत नवा पंचनामा मागितला. बुधवारी नवीन कागदपत्रे ससूनला रवाना झाली. सायंकाळी पाच वाजता शवविच्छेदनाला प्रारंभ झाला. त्या नंतर रात्री अंत्यसंस्कार होणार होते. यात तब्बल तीस तासांचा वेळ गेला.

राणीच्या हत्येचे कारण अद्यापही अनुत्तरीतच
पत्नीलागोळी घालून ठार मारण्यामागे काय कारण दडले होते. या विषयी अद्यापही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाही. पत्नीची बदली गैरसोयीच्या ठिकाणी झाल्याने आरोपी जवानाने प्राथमिक आरोग्य केंद्रात खून करण्यापूर्वी त्रागा केला होता. त्यानंतर त्याने पत्नीचा गोळी घालून खून केला. एवढे टोकाचे पाऊल उचलण्यासाठी काय कारण असावे याचा उलगडा बुधवारी रात्रीपर्यंत झाला नव्हता.