आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sugarcane Rate Should Be Determine By Factory Harshvardhan Patil

ऊसदर कारखान्यांनी ठरवावा - हर्षवर्धन पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - उसाला किती दर द्यायचा हे सरकारने नव्हे, तर साखर कारखानदारांनी ठरवावे, असे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी सांगितले.श्रीगोंदे साखर कारखान्याचा चाळीसाव्या गळीत हंगामाचा प्रारंभ पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव नागवडे होते. पाटील म्हणाले, उसाच्या दरप्रश्‍नी प्रत्येक वेळा आंदोलने होतात. मग सरकारकडे बोट दाखवले जाते. वास्तविक साखर कारखान्यांना जो परवडेल तो दर त्यांनी दिला पाहिजे. यात सरकार म्हणून आमची हरकत असणार नाही. घोड व कुकडीच्या पाणी प्रश्‍नावर येथील नेतृत्वाने पुढाकार घ्यावा, आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. पाणीप्रश्‍नावर ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. पाणी ही राज्याची संपत्ती आहे. ती कोणा एका जिल्ह्याची किंवा तालुक्याची नाही, याचे भान आंदोलकांनी ठेवावे, असे ते म्हणाले.

नागवडे म्हणाले, राज्यात साखरेचे विक्रमी उत्पादन होत आहे. खर्चही वाढत आहे. भावाची अपेक्षा करणार्‍यांनी राज्य व केंद्र सरकारचे किती कर कारखान्यांना भरावे लागतात याचा अभ्यास करावा.

सरकारने कर माफ केले, तर मग हवा तेवढा दर देता येईल. प्रास्ताविक श्रीगोंदे कारखान्याचे माजी अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले. सूत्रसंचालन संचालक अँड. अशोक रोडे यांनी केले. आभार उपाध्यक्ष केशव मगर यांनी मानले.